Dharmendra News: बॉलिवूडचे ही-मॅन धर्मेंद्र यांचं आयुष्य कायमच संघर्ष आणि कष्टाने व्यापलेले होतं. पंजाबमधील एका छोट्या शहरातून बाहेर पडून त्यांनी मोठ्या स्वप्नांसह सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं, त्यावेळेस त्यांचा प्रवास इतका दीर्घ आणि शानदार असेल, याची कोणीही कल्पना केली नसावी.
एका स्पर्धेनं बदललं आयुष्य, अन्...
एका नॅशनल टॅलेंट हँट शोद्वारे धर्मेंद्र यांनी सिनेमांच्या दुनियेत प्रवेश केला होता. ही स्पर्धा त्यांच्यासाठी नशीब बदलणारी ठरली. सिनेसृष्टीत एण्ट्री करण्यासाठी धर्मेंद्र प्रचंड उत्सुक होते. ते त्यांच्या पहिल्या सिनेमाच्या निर्मात्यांना भेटण्यास पोहोचले आणि सिनेमा साइन करुन मानधन घेण्यासाठी वाट पाहत होते. त्यांना वाटलं खूप मोठी रक्कम मिळेल, पण काहीतरी भलतंच घडलं.
धर्मेंद्र यांना पहिल्या सिनेमासाठी मिळाले फक्त इतकेच रुपये
पहिला सिनेमा साइन करण्यासाठी त्यांना केवळ 51 रुपये मिळाले. धर्मेंद्र यांचा मे 1977 रोजी ऊर्दू भाषिक मासिक 'रूबी'मध्ये 'माझे लहानपण आणि तारुण्य' ('मेरा बचपन और जवानी') असे शीर्षक असलेला त्यांचा लेख छापून आला. लेखाद्वारे त्यांनी सांगितलं होतं की, पहिल्या सिनेमाचे निर्माते टी.एम.बिहारी आणि त्यांचे सहकारी ठक्कर यांनी स्वतःचे खिसे रिकामे करून मला 51 रुपये दिले. बिहारी यांनी 17 रुपये आणि उर्वरित पैसे ठक्कर यांनी दिले. 500 रुपये मिळतील या आशेने मी तेथे उत्साहात बसलो होतो". ही घटना त्यांच्या सुरुवातीच्या संघर्षाच्या काळातील सर्वात गोड आठवणींपैकी एक होती.
जेव्हा धर्मेंद्र यांनी 'शोला और शबनम' सिनेमाचा करार केला, तेव्हा 'दिल भी तेरा, हम भी तेरे' हा सिनेमा रिलीज झाला होता, अर्जुन हिंगोरानी दिग्दर्शित सिनेमामध्ये बलराज सहनी आणि कुमकुम हे कलाकार देखील होते. हिंगोरानींचा हा पहिला हिंदी सिनेमा होता, यापूर्वी त्यांनी भारतातील पहिला सिंधी भाषिक सिनेमा 'अबाना' तयार केला होता.
स्ट्रगलच्या काळात या दिग्दर्शकाने धर्मेंद्र यांना केली मदत
लेखामध्ये धर्मेंद्र यांनी सुरुवातीच्या दिवसात संधी दिल्याबाबत हिंगोरानी यांचे आभार मानले होते. धर्मेंद्र यांच्याकडे राहण्यासाठी घर नव्हते, जेवणासाठी पैसेही नव्हते; अशा परिस्थितीत हिंगोरानींनी धर्मेंद्र यांना स्वतःच्या घरामध्ये राहण्यास जागा दिली आणि त्यांच्या खाण्यापिण्याचीही सोय केली. रेस्टोरेंटमध्ये हिंगोरानींनी ही-मॅनसाठी खास व्यवस्था केली होती, तेथे त्यांना रोज स्लाइस ब्रेड, बटर आणि एक कप चहा मोफत मिळत होता. या मदतीचा धर्मेंद्रंनी आयुष्यातील एक मौल्यवान आधार म्हणून उल्लेख केला.
(नक्की वाचा: Bobby Deol: बॉबी देओलसाठी धर्मेंद्र, सनी, प्रकाश कौरपेक्षाही महत्त्वाची ही आहे व्यक्ती; मुलाखतीत केला खुलासा)
प्रत्येक सिनेमाचे नाव 'क' अक्षरापासून सुरूधर्मेंद्र आणि हिंगोरानी यांचे नाते पहिल्या सिनेमापर्यंत मर्यादित राहिले नाही, तर पुढेही त्यांनी अनेक सिनेमे केले. हिंगोरानींच्या सिनेमांचं वैशिष्ट्य हे होतं की, त्यांच्या बहुतांश सिनेमांचे नाव तीन शब्दांमध्ये असायचे आणि प्रत्येक नावाची सुरुवात 'क' अक्षरापासून होत असे. त्यांच्या सिनेमांमध्ये धर्मेंद्र कायम मुख्य भूमिकांमध्ये झळकायचे. उदाहरणार्थ 'कब? क्यों? और कहां?' (1970), 'कहानी किस्मत की' (1973), 'खेल खिलाड़ी का' (1977), 'कातिलों के कातिल' (1981), 'करिश्मा कुदरत का' (1985), 'कौन करे कुर्बानी' (1991), आणि 'कैसे कहूं कि… प्यार है' (2003); पण 'सल्तनत' (1986) हा सिनेमा यास अपवाद होता.
(नक्की वाचा: Dharmendra News: हेमा मालिनी पहिल्यांदा प्रेग्नेंट असताना लपून भेटल्या सासूबाई, या भेटीत जे घडलं ते प्रचंड...)
हिंगोरानी यांच्या सिनेमामध्ये धर्मेंद्र यांच्यासह ऋषी कपूर, मिथुन चक्रवर्ती आणि गोविंदा यांनीही काम केलंय. यानंतर हिंगोरानींनी काही सिनेमांमध्ये धर्मेंद्र यांचा मुलगा सनी देओलसोबतही काम केलं.
(Content : Source IANS)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
