Hrithik Roshan Dance Video: बाप से बेटा सवाई! तारे गिन गिन गाण्यावर हृतिक रोशननं मुलांसोबत केला धमाकेदार डान्स

Hrithik Roshan Dance Video: बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनने इन्स्टाग्रामवर त्याच्या दोन मुलांसोबत डान्स करताना व्हिडीओ शेअर केलाय.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Hrithik Roshan Dance Video: हृतिक रोशनचा डान्स व्हिडीओ व्हायरल"
Hrithik Roshan Instagram

Hrithik Roshan Dance Video: बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन कुटुंबीयांसोबत चुलत भाऊ ईशान रोशनच्या लग्नामध्ये सहभागी झाला होता. या लग्नसोहळ्यामध्ये संपूर्ण रोशन कुटुंबाने धम्माल केल्याचे पाहायला मिळालं. या लग्नसोहळ्यातील हृतिक रोशनचे त्याच्या मुलांसह गर्लफ्रेंडसोबतचे फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हृतिकनेही लग्नसोहळ्यातील खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये हृतिक त्याची मुलं हृहान आणि हृदानसह गर्लफ्रेंड सबा आझादसोबत 'तारे गिन गिन' गाण्यावर डान्स करताना दिसतोय. 

हृतिक रोशनने मुलांसोबत केला धमाल डान्स | Hrithik Roshan Dance Video Viral

हृतिक रोशनची मुलं त्याच्यासारखीच कमाल डान्स करतात. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक आणि कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडलाय. एका युजरनं लिहिलंय की, द रोशन टीमने डान्स फ्लोअर चमकावला. "लोकांचे लक्ष कसं वेधून घ्यायचे हे द रोशन्सना चांगलंच माहितीये", अशी कमेंट एका चाहत्याने केलीय.  

हृतिक रोशन आणि त्याच्या मुलांचा डान्स व्हिडीओ पाहा

सबा आझादचेही व्हिडीओ व्हायरल 

हृतिकने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सबा आझादही आहे. लग्न सोहळ्यासाठी सर्वांनी मॉडर्न पारंपरिक लुक कॅरी केले होते. सबा आणि हृतिकचा लुक नेटकऱ्यांना प्रचंड आवडला.  

Advertisement

(नक्की वाचा: Rehman Dakait Son: रहमान डकैतच्या 3 पत्नी, 13 मुलं; सर्वात छोटा मुलगा काय करतो? क्राइम नव्हे ही गोष्टी आवडते)

हृतिक आणि सबा आझादने वर्ष 2022मध्ये त्यांच्यातील प्रेमाचं नातं जाहीर केले. यानंतर कित्येक इव्हेंट कॉन्सर्टसह कौटुंबिक सोहळ्यांमध्येही हे जोडपे एकत्रित हजेरी लावताना पाहायला मिळालंय. इन्स्टाग्रामवरही दोघं एकमेकांचे फोटो शेअर करत असतात. 

Advertisement