जाहिरात

Rehman Dakait Son: रहमान डकैतच्या 3 पत्नी, 13 मुलं; सर्वात छोटा मुलगा काय करतो? क्राइम नव्हे ही गोष्टी आवडते

Rehman Dakait Son: धुरंधर सिनेमानंतर पाकिस्तानातील गँगस्टर रहमान डकैतसंदर्भातील वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत.

Rehman Dakait Son: रहमान डकैतच्या 3 पत्नी, 13 मुलं; सर्वात छोटा मुलगा काय करतो? क्राइम नव्हे ही गोष्टी आवडते
"Rehman Dakait Son: रहमान डकैतचा छोटा मुलगा कोण आहे?"

Rehman Dakait Son: रहमान डकैत हे नाव आतापर्यंत सर्वांच्याच परिचयाचे झालंय कारण धुरंधर सिनेमा रिलीज झाल्यानंतर आतापर्यंत या नावाचीच सर्वाधिक चर्चा ऐकायला मिळतेय. अक्षय खन्नाने पाकिस्तानातील कुख्यात गँगस्टर रहमान डकैतची भूमिका उत्तमरित्या साकारलीय, यासाठी त्याचंही कौतुक केलं जातंय. रहमान डकैत किंवा रहमान बलोचबाबत पाकिस्तानात आताही मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे, यादरम्यान त्याच्या कुटुंबातील सदस्यांबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातोय. रहमान डकैतचा छोटा मुलगा काय करतो आणि गुन्हेगारी विश्वापासून तो किती दूर आहे, याबाबत माहिती जाणून घेऊया... 

तीन पत्नी आणि 13 मुलं

धुरंधर सिनेमामध्ये रहमान डकैतची एक पत्नी आणि दोन मुलं दाखवण्यात आलीयेत, ज्यापैकी एका मुलाचा मृत्यू झाल्याचंही पाहायला मिळालं. पण रहमान डकैतच्या तीन पत्नी आणि 13 मुलं आहेत. त्यामुळे आता रहमान डकैतच्या या मुलांबाबत माहिती जाणून घेण्याचा लोक प्रयत्न करत आहेत.  

Dhurandhar OTT release date: Netflix, Amazon Prime का Jio Hotstar? धुरंधर कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर पाहता येणार?

(नक्की वाचा: Dhurandhar OTT release date: Netflix, Amazon Prime का Jio Hotstar? धुरंधर कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर पाहता येणार?)

रहमान डकैतचा छोटा मुलगा काय करतो? 

रहमान डकैतच्या तिसऱ्या पत्नीचा छोटा मुलगा अब्दुल रहीमचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. पाकिस्तानातील यू-ट्युबर उज्मा ताहिरने रहमान डकैतचा सर्वात छोट्या मुलाची मुलाखत घेतलीय. मुलाखतीत रहीमने सांगितलं की, तो काय करतो आणि भविष्यासाठी त्याने काय योजना आखल्या आहेत. रहीमने सांगितलं की, वडिलांचा एन्काउंटर झाला त्यावेळेस तो केवळ सात महिन्यांचा होता. रहीम सध्या इयत्ता नववीमध्ये शिकतोय आणि त्याला बॉक्सिंगमध्ये प्रचंड आवड आहे. भविष्यात आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग प्लेअर होण्याची त्याची इच्छा आहे. 

Dhurandhar: धुरंधर सिनेमात दाखवलेला उजैर बलोच नक्की कोण?'तो' जुना इंटरव्ह्यू पाहून उडेल थरकाप, पाहा Video

(नक्की वाचा: Dhurandhar: धुरंधर सिनेमात दाखवलेला उजैर बलोच नक्की कोण?'तो' जुना इंटरव्ह्यू पाहून उडेल थरकाप, पाहा Video)

    धुरंधर सिनेमाचाही केला उल्लेख 

    यूट्यूब व्हिडीओमध्ये रहमान डकैतचा छोटा मुलगा रहीमने धुरंधर सिनेमाबाबतही उल्लेख केलाय. सिनेमामध्ये वडिलांची प्रतिमा योग्य दाखवण्यात आलेली नाही, असेही रहीमने सांगितलंय. वडील गरिबांना मदत करायचे, असे त्यानं म्हटलंय. चार-पाच वर्षांचा झाल्यानंतर आईला वडिलांबाबत विचारणा केली असता रहमान डकैत वडील असल्याचे समजल्याचंही रहीमने मुलाखतीत सांगितलं. 

    Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

    Follow us:
    Listen to the latest songs, only on JioSaavn.com