जाहिरात

Lalit Manchanda Death: बॉलिवूड अभिनेत्याने संपवलं आयुष्य, सिनेविश्व हादरलं; धक्कादायक कारण समोर

lalit manchanda Death: अभिनेत्याने गळफास घेऊन आयुष्य संपवले असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे.

Lalit Manchanda Death: बॉलिवूड अभिनेत्याने संपवलं आयुष्य, सिनेविश्व हादरलं; धक्कादायक कारण समोर

मेरठ:  हिंदी सिनेविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेता ललित मनचंदा याने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मेरठमध्ये राहत्या घरी या अभिनेत्याने गळफास घेऊन आयुष्य संपवले असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

अभिनेता ललित मनचंदाने अनेक बॉलिवूड चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांमध्ये छोट्या भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या अलीकडील प्रोजेक्ट्समध्ये एक वेब सिरीज देखील होती, ज्याबद्दल तो खूप उत्सुक होता, त्याआधीच त्याने जीवन संपवल्याने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की ते काही काळापासून मानसिक ताणतणाव आणि वैयक्तिक समस्यांनी ग्रस्त होते. या दुःखद घटनेमुळे त्याचे कुटुंबीय, चाहत्यांसह सिनेविश्वातील सेलिब्रेटी हळहळ व्यक्त करत आहेत.

ललितच्या कुटुंबाची चौकशी

या आत्महत्येमागील कारणे शोधण्यासाठी पोलिसांनी ललितच्या कुटुंबीयांची आणि मित्रांची चौकशी सुरू केली आहे. त्याच्या घरातून कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही, त्यामुळे तपास अधिक खोलवर करण्याची गरज आहे. ललित हा एक मैत्रीपूर्ण आणि शांत व्यक्ती मानला जात असल्याने स्थानिक आणि शेजारीही या घटनेने धक्का बसला आहे.

(नक्की वाचा-  "भांडण बाजूला ठेवायला तयार!", उद्धव ठाकरेंची अटींसह राज यांच्यासोबत यायला तयारी)

दरम्यान, मनोरंजन विश्वातील वाढत्या आत्महत्यांच्या घटनांमुळे पुन्हा एकदा मानसिक आरोग्याच्या समस्या ऐरणीवर आल्या आहेत. तज्ञांचे म्हणणे आहे की तणाव आणि नैराश्याने ग्रस्त असलेल्या लोकांना वेळेवर मदत आणि आधाराची आवश्यकता असते. ललितच्या मृत्यूने त्याच्या प्रियजनांना खूप धक्का बसला आहे आणि मानसिक आरोग्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याची भावना त्याच्या निकटवर्तीयांनी व्यक्त केली आहे. 

नक्की वाचा - Prajakta Mali : प्राजक्ता माळीने अख्ख्या जगालाच केलं चॅलेन्ज, नॉनव्हेज खाण्यावरून तोडले अकलेचे तारे!

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: