
Uddhav Thackeray - Raj Thackeray News : राज ठाकरे यांच्या युतीबाबतच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी देखील मराठी माणसांसाठी आणि महाराष्ट्रासाठी हितासाठी एकत्र यायला तयार आहे. मी देखील किरकोळ भांडण बाजूला ठेवायला तयार आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. मात्र युती करायची असेल तर उद्धव ठाकरेंना काही अटी ठेवल्या आहेत. मुंबईतील एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
राज ठाकरेंच्या महाराष्ट्र हितासाठी एकत्र येण्याच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, "मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी मी देखील किरकोळ भांडण बाजूला ठेवायला तयार आहे. मी देखील मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी सर्वांना एकत्र येण्याचं आवाहन करतो. पण माझी एक अट आहे."
(नक्की वाचा- Raj Thackeray Interview : "आमच्यातील वाद किरकोळ", उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत राज ठाकरेंंचं मोठं वक्तव्य)
"लोकसभेच्या वेळी आम्ही सांगत होतो, राज्यातून उद्योग गुजरातला पळवून नेले जात आहेत. तेव्हाच विरोध केला असता तर हे सरकार तिथे बसलं नसतं. केंद्रात महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार बसवलं असतं. तसेच राज्यातही महाराष्ट्राचा विचार करणारं सरकार बसलं असतं. पण तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायच आणि मग तडजोड करायची हे असं चालणार नाही", असं स्पष्ट भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली.
"महाराष्ट्राच्या हिताच्या जो आड येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याच्या पंगतील बसणार हे आधी ठरला. मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा. माझ्याकडून कुणाशी भांडणे नव्हतीत, पण मिटवून टाकली चला. सर्व मराठी माणसांनी ठरवायचं भाजपसोबत जायचं की शिवसेनेसोबत म्हणजे एसंशिं, गद्दार नव्हे तर माझ्यासोबत जायचं", असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
(नक्की वाचा- "मी राज ठाकरेंना भेटेन आणि विनंती करेन", हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर बावनकुळे काय म्हणाले?)
"कुणासोबत जाऊन मराठी माणसाचं आणि हिंदुत्वाचं हित होणार आहे हे ठरवा. मग विरोध करायचा की बिनशर्त पाठिंबा द्यायचा याचा विचार करा. महाराष्ट्राचं हित ही एकच शर्त माझी आहे. पण मग बाकीच्या चोरांना कळत नकळत पाठिंबा देणार नाही. त्यांचा छुपा भेटी किंवा प्रचार करणार नाही, अशी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर शपथ घ्यायची. मग टाळी द्यायची भाषा करा", असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world