Vicky Kaushal VIDEO: अभिनेता विकी कौशलचं मुंबई विमानतळावर एका चाहत्याने खास पद्धतीने केले, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यावेळी चाहत्याकडून छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती स्वीकारताना विकीने केलेले विनम्र कृत्य सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे. विकीच्या या वागण्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, एक चाहता विकीच्या खांद्यावर शाल टाकत आहे, तेव्हा विकी विनम्रपणे हात जोडून त्याचे आभार मानतो. यानंतर त्या चाहत्याने त्याला छत्रपती संभाजी महाराजांची एक छोटी मूर्ती भेट दिली. या मूर्तीचा स्वीकार करताना विकीने केलेले कृत्य अनेकांना भावले. त्याने तातडीने आपले शूज काढले आणि त्यानंतर मूर्ती स्वीकारली. विकीच्या या कृतीचे अनेकांनी कौतुक केले असून, 'हेच खरे संस्कार' अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
(नक्की वाचा- ऐश्वर्या, सुष्मिताला टक्कर, अक्षयकुमारसोबत डेब्यू; अचानक 'बौद्ध भिक्षुणी' बनलेल्या अभिनेत्रीची कहाणी)
विकीने चाहत्याकडून दिलेली भेट आनंदाने स्वीकारली आणि त्याच्यासोबत फोटो काढले. या प्रवासादरम्यान विकीने ग्रे रंगाची हुडी आणि मॅचिंग पॅन्ट घातली होती, ज्यामुळे त्याचा लूक साधा पण स्टायलिश दिसत होता.
(नक्की वाचा- Atharva Sudame Controversy Video : अथर्व सुदामेचं काय चुकलं? पाहा डिलिट केलेला Video)
विकी कौशलने अलीकडेच 'छावा' या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती. त्यामुळे त्याच्या या कृतीला विशेष महत्त्व आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरच्या या ऐतिहासिक चित्रपटात संभाजी महाराजांनी आपल्या राज्याचे आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी दाखवलेल्या शौर्याची गाथा सांगितली आहे. शिवाजी सावंत यांच्या 'छावा' या मराठी कादंबरीवर आधारित या चित्रपटात विकीसोबत अक्षय खन्ना, रश्मिका मंदाना, डायना पेंटी, विनीत कुमार सिंग आणि आशुतोष राणा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
यावर्षी 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामुळे विकीला त्याच्या कारकिर्दीतील एक महत्त्वपूर्ण आणि दमदार भूमिका साकारण्याची संधी मिळाली. सध्या तो रणबीर कपूर आणि आलिया भट्टसोबत संजय लीला भन्साळी यांच्या 'लव्ह अँड वॉर' या आगामी चित्रपटाच्या तयारीमध्ये व्यस्त आहे.