
गेल्या काही दिवसांपासून हिंदी सिनेसृष्टीसह क्रीडाविश्वातील अनेक दिग्गज सेलिब्रेटींच्या घटस्फोटाच्या बातम्या चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माच्या घटस्फोटाच्या बातम्या रंगल्या होत्या. अशातच आता बॉलिवूडमधील आणखी एका कपलच्या घटस्फोटाची चर्चा सुरु झाली आहे. बॉलिवूडमधील पॉवरफुल जोडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करीना कपूर आणि अभिनेता सैफ अली खानच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर सोशल मीडियावर चर्चेत आहेत. सैफ अली खानवरील जीवघेण्या हल्ल्यानंतर माध्यमांमध्ये दोघांची जोरदार चर्चा पाहायला मिळत होती. अशातच आता बॉलिवूडची बेबो म्हणजेच करीना कपूरने शेअर केलेल्या एका पोस्टने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या पोस्टमध्ये करीना कपूरने लग्न, घटस्फोट आणि मुलांबाबत चिंता व्यक्त केली आहे. यावरुनच दोघांच्या नात्यांमध्ये दुरावा आला आहे का? असा संशय नेटकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
तुम्ही लग्न, घटस्फोट, चिंता, प्रसुती, आपल्या जवळच्याच निधन, पालकत्व या सगळ्या गोष्टींना कधी समजू शकणार नाही. जोपर्यंत तुमच्यासोबत हे सगळं घडत नाही, तो पर्यंत तुम्हाला कळणार नाही. तुम्ही विचार करत असाल की तुम्ही दुसऱ्यांपेक्षा अधिक हुशार आहात. तर आयुष्यात तुमच्यासोबत असं काही होत नाही तोपर्यंत तुमच्यात नम्रता येत नाही आणि त्यामुळे तुम्ही इतरांपेक्षा हुशार आहात असं वाटतं... असे करीनाने या पोस्टमध्ये म्हटले आहे.
नक्की वाचा - Aarushi Pokhriyal Nishank : बॉलिवूड प्रेम पडलं महागात; माजी मुख्यमंत्र्यांच्या देखण्या मुलीला 4 कोटींचा चुना
अभिनेत्रीची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यावर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्यात. विशेष म्हणजे या पोस्टमध्ये करीनाने लग्न आणि घटस्फोट हे शब्द अधोरेखित केल्याने चाहत्यांची चिंता चांगलीच वाढली आहे. या पोस्टखाली नेटकऱ्यांनी दोघांमध्ये आलबेलं नसल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत, तर काही जणांनी काय झालं? असा सवालही केला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सैफ अली खानच्या वांद्रे येथील राहत्या घरात जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यात सैफ अली खान गंभीर जखमी झाला होता. या हल्ल्यानंतर सैफवर मुंबईच्या लिलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. याप्रकरणी हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे. या हल्ल्यानंतर करीनाने केलेल्या या पोस्टमुळे चर्चा रंगल्या आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world