जाहिरात

Madhuri Dixit Controversial Song: माधुरी दीक्षितचे गाणं ठरलं वादग्रस्त, कोर्टात गेले प्रकरणं, पुढे काय झालं?

Madhuri Dixit Banned Song: माधुरी दीक्षितचा सुपरहिट सिनेमा 4 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता. बॉक्सऑफिसवर सिनेमाने 21 कोटी रुपयांची कमाईही केली होती. सिनेमातील गाजलेल्या गाण्याची देशभरात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती. पण वादही तितकाच निर्माण झाला होता.

Madhuri Dixit Controversial Song: माधुरी दीक्षितचे गाणं ठरलं वादग्रस्त, कोर्टात गेले प्रकरणं, पुढे काय झालं?
Madhuri Dixit Most Controversial Song: माधुरी दीक्षितचे सर्वाधिक वादग्रस्त ठरलेले गाणं
Social Media

Madhuri Dixit Banned Song: बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) नव्वदच्या दशकातील अशी सुपरस्टार होती की तिच्यासोबत काम करण्याचे प्रत्येक अभिनेत्याचे स्वप्न होते. माधुरी दीक्षित 'धक धक गर्ल' नावानेही प्रसिद्ध होती. तिचे हास्य आणि डान्सवर लाखो चाहते फिदा होते. पण तुम्हाला माहितीये का? माधुरीचे एक गाणं इतके वादग्रस्त ठरले की दूरदर्शन आणि रेडिओवर या गाण्यावर बंदी घालण्यात आली होती. 1993मधील सुपरहिट 'खलनायक' सिनेमातील 'चोली के पीछे क्या है' गाण्याने त्याकाळी धुमाकूळ घातला होता. 

माधुरी दीक्षितच्या या गाण्याने धुमाकूळ घातला होता 

सुभाष घई दिग्दर्शित 'खलनायक' सिनेमामध्ये संजय दत्त, माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफ मुख्य भूमिकेत होते. केवळ 4 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या या सिनेमाने बॉक्सऑफिसवर 21 कोटी रुपयांची कमाई केली होती. पण एका गाण्यामुळे सिनेमा वादात अडकला होता. अल्का यागनिक आणि ईला अरुण यांनी गायलेले सिनेमातील 'चोली के पीछे क्या है' गाणं वादग्रस्त ठरले. अनेकांनी गाण्याचे बोल अश्लील आणि महिलांसाठी आक्षेपार्ह असल्याचे म्हणत टीका केली. गाण्याविरोधात संताप इतका वाढला की प्रकरण न्यायालयात पोहोचले. तक्रारदारांनी सेन्सॉर बोर्डाकडे चित्रपटातून हे गाणे काढून टाकण्याची आणि विकल्या गेलेल्या सर्व कॅसेट परत मागवण्याची मागणी केली. गाण्याचे बोल अश्लील आणि महिलांप्रति आक्षेपार्ह असल्याची टीका काही लोकांनी केली होती. गाण्याविरोधात नाराजी इतक्या मोठ्या प्रमाणात व्यक्त करण्यात आली की हे प्रकरण थेट न्यायालयात पोहोचले. सेन्सॉर बोर्डने हे गाणं सिनेमातून एडिट करण्याची आणि विक्री केलेल्या सर्व कॅसेट पुन्हा मागवण्याची मागणी तक्रारदारांनी केली. 

(नक्की वाचा: माधुरी दीक्षितच्या गाण्यावर तरुणींनी धबधब्याखाली केला डान्स, VIDEO पाहून विसराल अभिनेत्रीचा डान्स)

गाण्याबाबत कोर्टाने काय दिला निकाल?

गाण्यामध्ये काहीही आक्षेपार्ह नाहीय, असा निर्णय कोर्टाने सुनावणीदरम्यान दिला. तरीही वाद निवळला नाही. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी गाण्याचे समर्थन करत म्हटलं की, गाण्यामध्ये काहीही चुकीचे नाहीय, त्यामुळे निषेध करणं थांबवले पाहिजे. तरीही दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओने या गाण्यावर बंदी घातली, यामुळे टीव्ही आणि रेडिओवर गाण्याचे प्रसारण थांबवण्यात आले.

(नक्की वाचा: Nana Patekar : तो एक प्रश्न आणि नाना पाटेकर माधुरी दीक्षितच्या आठवणीत बुडाले)

रीमेकने पुन्हा जिंकलं प्रेक्षकांचे मन 

माधुरी दीक्षितचे हे गाणं इतके गाजले होतं की 2024मध्ये करीना कपूर, तब्बू आणि कृति सेनॉन यांच्या 'क्रू' सिनेमामध्ये त्याचे रीमेक व्हर्जन प्रेक्षकांना पाहायला मिळालं. हे गाणंही प्रेक्षकांना प्रचंड आवडलं. "चोली के पीछे क्या है" या गाण्याने त्यावेळेस लोकांच्या मनावर वर्चस्व गाजवलं होतं. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com