
Dance Viral Video: सोशल मीडियावर दरदिवशी गंमतीशीर तसेच शानदार व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके भन्नाट असतात की ते सतत पाहण्याची इच्छा होते. रेसिपी, व्यायाम, योग असे वेगवेगळ्या प्रकार व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. पण डान्सचे व्हिडीओ इतके जबरदस्त असतात की रील स्टार्ससमोर बॉलिवूड कलाकार देखील फिके वाटू लागतात. पावसाळा ऋतुला सुरुवात झाली की लोक माधुरी दीक्षितच्या गाजलेल्या "चक धूम-धूम" गाण्यावर डान्स व्हिडीओ शूट करतात. दोन तरुणींचा असा एक कमाल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय, ज्यामध्ये दोघी धबधब्याखाली डान्स करताना दिसत आहेत. या दोघींच्या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. त्यांचा डान्स इतका शानदार आहे की लोक माधुरी दीक्षितलाही विसरू लागले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
धबधब्याखालील शानदार डान्स
व्हायरल व्हिडीओमध्ये दोन तरुणी धबधब्याखाली नाचताना दिसत आहेत. दोघींच्याही डान्स स्टेप्स इतक्या भन्नाट आहेत की व्हिडीओ पाहणाऱ्यांची त्यांच्यावरुन नजरच हटणार नाही. त्यांच्या डान्स स्टेप्स अगदी अभिनेत्रीसारख्याच आहेत. हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिलाय आणि लाइक्सचा देखील पाऊस पडत आहे. नेटकऱ्यांनी कमेंट्स करुन त्यांचे कौतुकही केलंय. एका युजरने लिहिलंय की,"मान्सूचा सर्वात खास डान्स". पूल पार्टीपेक्षाही जास्त धमाल, असेही एका युजरनं लिहिलंय. आणखी एका व्यक्तीने लिहिलंय की, "माधुरी दीक्षितलाही हा डान्स टक्कर देत आहे".
(नक्की वाचा: स्वतःच्याच लग्नात नववधूचा काजोलच्या गाण्यावर धमाकेदार डान्स! पाहणाऱ्यांच्या अंगावर आले शहारे, लग्नच विसरले)
Barsht Maaza logiye Jharna Ke sath pic.twitter.com/uVYF78xXbJ
— Viral Society (@viralsociety_) July 15, 2024
शाहरुख-माधुरीच्या सिनेमातील गाणे
शाहरुख खान, माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि करिश्मा कपूरचा सुपरहिट सिनेमा 'दिल तो पागल है' (Dil To Pagal Hai) सिनेमातील चक धूम-धूम हे गाजलेले गाणे आहे. हे गाणं माधुरी दीक्षित आणि शाहरुख खानवर चित्रित करण्यात आले होते. हा सिनेमा देखील ब्लॉकबस्टर ठरला होता. लव्ह ट्रँगलची कहाणी असलेला हा सिनेमा आजही सिनेरसिक आजही तितक्याच आवडीने पाहतात. शाहरुख आणि माधुरीच्या जोडीवर सिनेरसिकांनी भरभरुन प्रेम केले होते.
(नक्की वाचा: एक गाव जेथे नववधूसाठी श्राप होता लाल रंगाचा लेहंगा, अचानक व्हायची गायब! कोण होता जानी दुश्मन?)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world