जाहिरात

Mouni Roy: वृद्धाचे अश्लील चाळे, कमरेवर हात, गुलाब फेकले.. बॉलिवूड अभिनेत्रीसोबत गैरवर्तन, पोस्ट व्हायरल

मौनी एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी करनाल येथे गेली होती, यावेळी हा संपूर्ण प्रकार घडला. अभिनेत्रीने तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर हा संतापजनक अनुभव शेअर केला आहे.

Mouni Roy: वृद्धाचे अश्लील चाळे, कमरेवर हात, गुलाब फेकले.. बॉलिवूड अभिनेत्रीसोबत गैरवर्तन, पोस्ट व्हायरल

Mouni Roy Harassment:  बॉलिवूडची बोल्ड आणि बिंधास्त अभिनेत्री म्हणून मौनी रॉयचे नाव घेतले जाते. सोशल मीडियावर प्रचंड मोठा चाहतावर्ग असलेल्या मौनीची एक झलक पाहण्यासाठी तिचे फॅन्स नेहमीच उत्सुक असतात. अशाच काही उत्साही चाहत्यांनी मौनी रॉयसोबत असभ्य वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हरियाणामधील एका कार्यक्रमादरम्यान ही घटना घडली असून मौनीने इंस्टाग्रामवर आपबिती सांगत संताप व्यक्त केला आहे.

नेमकं काय घडलं? 

अभिनेत्री मौनी रॉयसोबत हरियाणामधील एका कार्यक्रमावेळी चाहत्यांनी असभ्य आणि अश्लील वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  हरियाणामध्ये छळाचा आरोप करण्यात आला होता. मौनी एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी करनाल येथे गेली होती, यावेळी हा संपूर्ण प्रकार घडला. अभिनेत्रीने तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर हा संतापजनक अनुभव शेअर केला आहे.

रिया चक्रवर्तीपासून ते देओल कुटुंबाच्या मुलीपर्यंत..या 40 वर्षांच्या हिरोचं होतं 5 अभिनेत्रींसोबत अफेअर

या स्टोरमध्ये मौनीने सांगितले की, "काल करनालमध्ये एक कार्यक्रम झाला होता आणि चाहत्यांच्या वागण्याने मला वाईट वाटले, -आजोबांच्या वयाच्या दोन काकांनी गैरवर्तन केले. कार्यक्रम सुरू होताच मी स्टेजकडे गेले  तेव्हा काका आणि कुटुंबातील सदस्यांनी (सर्व पुरुषांनी) फोटोसाठी पोज देताना माझ्या कंबरेवर हात ठेवले. मी 'सर, कृपया तुमचे हात काढा, असे म्हटलं मात्र त्यांना ते आवडले नाही."

Latest and Breaking News on NDTV

गुलाब फेकले, अश्लील कमेंट्स केल्या

 "स्टेजवर परिस्थिती आणखीनच बिकट झाली. दोन पुरुष माझ्यासमोर उभे राहिले आणि त्यांनी अश्लील कमेंट्स केल्या, अश्लील हावभाव केले आणि मला कमेंट्स केल्या. मी त्यांना हटकले तेव्हा त्यांनी माझ्यावर गुलाब फेकायला सुरुवात केली. त्यानंतर मी परफॉर्मन्सच्या मध्यभागी स्टेज सोडण्याचा प्रयत्न केला, पण नंतर परत येऊन काम संपवले. तरीही त्या व्यक्तींकडून गैरवर्तन सुरुच होते. कुटुंबाने किंवा आयोजकांनी त्यांना अडवले नाही. 

Big Boss Marathi 6: 'बिग बॉस'च्या घरात सागर कारंडेने मळली तंबाखू? कुणी हेरली चलाखी? VIDEO व्हायरल

मौनीने पुढे सांगितले की, "मी हे देखील नमूद करू इच्छिते की स्टेज उंचीवर होता आणि हे पुरुष खालून चित्रीकरण करत होते. जेव्हा कोणी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी त्यांना शिवीगाळ केली. मला माझा देश, माझे लोक आणि माझ्या परंपरा आवडतात, पण हे चुकीचे आहे. मी माझ्यासोबत घडलेल्या नकारात्मक गोष्टी कधीही शेअर करत नाही, पण हे... माझ्याकडे शब्द नाहीत." "आम्ही कलाकार वधू-वरांना शुभेच्छा देण्यासाठी, त्यांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी या कार्यक्रमांना उपस्थित राहतो. आम्ही त्यांचे पाहुणे आहोत, आणि तरीही आमच्याशी असे वागले जाते. हे घृणास्पद आहे."

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com