जाहिरात

Big Boss Marathi 6: 'बिग बॉस'च्या घरात सागर कारंडेने मळली तंबाखू? कुणी हेरली चलाखी? VIDEO व्हायरल

धनंजय पोवार म्हणजेच डीपी दादाने सागर कारंडेचा व्हिडिओ शेअर करत मोठा दावा केला आहे. बिगबॉसच्या घरात सागर कारंडे तंबाखू मळत असल्याचा दावा डीपी दादाने केला आहे.

Big Boss Marathi 6: 'बिग बॉस'च्या घरात सागर कारंडेने मळली तंबाखू? कुणी हेरली चलाखी? VIDEO व्हायरल

 Big Boss Marathi Season 6: बिग बॉस मराठी ६ 'चा सीझन सध्या चांगलाच गाजत आहे. एकापेक्षा एक अतरंगी कलाकारांच्या राड्यांनी बिगबॉसच्या घरातील वातावरण चांगलेच तापताना दिसत आहे. एकीकडे बिग बॉसच्या घरात होणाऱ्या स्पर्धकांमधील राड्यांची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत असतानाच आता अभिनेता सागर कारंडेच्या एका कृतीने लक्ष वेधले आहे. बिगबॉसच्या घरात अभिनेता सागर कारंडेने तंबाखू मळली असा दावा करण्यात येत असून त्याचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. 

बिग बॉसच्या घरात तंबाखू मळली..? 

'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता सागर कारंडे सध्या बिगबॉस मराठीचा मंच गाजवत आहे. बिगबॉसच्या घरात सागर कारंडेच्या शांत- संयमी खेळीचे कौतुक होत आहे. अशातच आता बिग बॉस सीझन 5चा स्पर्धक धनंजय पोवार म्हणजेच डीपी दादाने सागर कारंडेचा व्हिडिओ शेअर करत मोठा दावा केला आहे. बिगबॉसच्या घरात सागर कारंडे तंबाखू मळत असल्याचा दावा डीपी दादाने केला आहे.

Border 2 Collection Day 1: सनी देओलच्या 'बॉर्डर 2' ची छप्परफाड कमाई, धुरंधरलाही टाकलं मागे

इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत धनंजय पोवार म्हणतो की, मी काय दाखवतोय ते बघा, मला फक्त शंका आहे. सागर दादा काय करतोय माहित नाही. आरशात सगळं दिसतंय. सागर हात बडवतोय. म्हणजे तंबाखू खाणारा माणूस जे करतोय ते सगळं इकडे निदर्शनास यायला लागलंय. आता बघा, त्यातला कचरा काढला, हात मागे टाकला, त्याच्या पाठीमागे  कदाचित तंबाखूची पुडी आहे"

'डीपी'दादाने शेअर केला व्हिडिओ...

 "मला फक्त डाऊट आहे. खरं खोटं तुम्ही बघा. शब्दच नाहीत, सागर भाऊ मळ डबल.. असंही या व्हिडिओमध्ये धनंजय पोवारने म्हटलं आहे. धनंजय पोवारच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी तर कमेंट्समध्ये प्रभूसुद्धा तंबाखू खातो, त्याच्या तोंडात तंबाखू होती, असं म्हटलं आहे. तर काही नेटकऱ्यांनी यंदाचा सीझन खूपच बोअरिंग आहे, बघायची इच्छा होत नाही, असे म्हणत नाराजीही व्यक्त केली आहे. 

दरम्यान, बिग बॉस सीझन ६ मध्ये अभिनेता राकेश बापट, सागर कारंडे, दिपाली सय्यद, सोनाली राऊत या दिग्गज कलाकारांसह अनुश्री माने, राधा पाटील, दिव्या शिंदे,  प्रभू शेळके हे सोशल मीडिया स्टारही झळकत आहेत. घरातील नवनवीन राड्यांनी प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन होत आहे. या आठवड्याच्या शेवटी अभिनेता रितेश देशमुख भाऊचा धक्कामध्ये कोणाला धक्का देणार याकडे आता प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com