Radhika Apte Baby Bump Pics Viral: बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटेच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. राधिका आपटे लवकरच आई होणार आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करून तिने चाहत्यांसोबत गुड न्यूज शेअर केली आहे. बीएफआय लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिने 'सिस्टर मिडनाइट' (Sister Midnight) सिनेमाच्या स्क्रीनिंगसाठी हजेरी लावली होती. यावेळेस रेड कार्पेटवर तिने बेबी बम्प फ्लाँट केल्याचे पाहायला मिळाले. तिचा हा फोटो पाहून चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. सेलिब्रिटींपासून ते चाहत्यांकडूनही तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
(नक्की वाचा: बाबा सिद्दीकींच्या अंत्यदर्शनाला पोहोचली उर्वशी रौतेला, मात्र एक चूक पडली महागात; लोकांचा संताप!)
कोण आहे राधिका आपटेचा नवरा?
राधिका आपटेने वर्ष 2012मध्ये ब्रिटीश व्हायोलिन वादक आणि संगीतकार बेनेडिक्ट टेलरशी लग्न केले. नावाजलेले कलाकार असूनही हे जोडपे प्रसिद्धीपासून दूर राहणे पसंत करते. दरम्यान राधिका 2011मध्ये कंटेम्परी डान्स शिकण्यासाठी लंडनमध्ये गेली होती, त्यावेळेस तिची आणि बेनेडिक्टची ओळख झाली. यानंतर दोघंही एकत्रित राहू लागले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
(नक्की वाचा: काळविटाची शिकार झाली तेव्हा लॉरेन्स बिश्नोई 5 वर्षांचा होता, राम गोपाल वर्माने उपस्थित केले अनेक प्रश्न)
राधिका आपटेचा आगामी सिनेमा
राधिकाच्या आगामी प्रोजेक्ट्सबाबत सांगायचे झाले तर श्रीराम राघवन दिग्दर्शित 'मेरी ख्रिसमस' (Merry Christmas) सिनेमामध्ये ती महत्त्वपूर्ण भूमिका निभावणार आहे. या सिनेमामध्ये अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विजय सेतुपती यांच्याही मुख्य भूमिका आहेत. या व्यतिरिक्त कीर्ती सुरेशसोबत ती 'अक्का' या थ्रिलर सीरिजमध्येही झळकणार आहे.
(नक्की वाचा: रवीना टंडनवर झालेला हल्ला होता नियोजनबद्ध कटाचा भाग, अभिनेत्रीनं केला धक्कादायक गौप्यस्फोट)