Who Is Kabir Bahia: बॉलिवूड अभिनेत्री कृति सेनॉनने (Kriti Sanon) 'दो पत्ती' (Do Patti Movie) सिनेमाच्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात पर्दापण केले आहे. या सिनेमाला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. दुसरीकडे कृति तिच्या रिलेशनशिपमुळेही चर्चेत आहे. ब्रिटनमधील रहिवासी असणाऱ्या कबीर बहियासोबत कृति सेनॉन रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरू आहेत. नुकतेच हे दोघं मुंबई विमानतळावरही एकत्र दिसले होते. यावेळेस दोघांनीही फोटोग्राफर्ससमोर पोझ देण्यास नकार दिला. पण स्टायलिश लुक कॅरी केलेल्या कृतिने एकटीनेच हटके पोझ दिल्या. पापाराझींनी शेअर केलेल्या फोटोमध्ये एअरपोर्टवर कबीरच्या मागे कृति दिसत आहे. यावेळेस दोघांनीही काळ्या रंगाचे आउटफिट परिधान केले होते. पण या दोघांनी नेमके कुठे प्रवास केला? हे कळू शकलेले नाही.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
(नक्की वाचा: ऐश्वर्या राय अभिषेक बच्चनसोबत आहे इतकी एकनिष्ठ, हा आहे मोठा पुरावा)
कोण आहे कबीर बहिया ?
कबीर बहिया हा ब्रिटेनमधील ट्रॅव्हल एजन्सीचे मालक कुलजिंदर बहिया यांचा मुलगा आहे आणि वर्ल्डवाइड एव्हिएशन अँड टुरिझमचा मॅनेजिंग डायरेक्टर देखील आहे. रिपोर्ट्सनुसार कबीर बहियाचे वय 24 वर्षे इतके आहे. तर कृति सेनॉन 33 वर्षांची आहे. या दोघांमध्ये तब्बल 9 वर्षांचे अंतर आहे. कबीरने रीजेंट युनिव्हर्सिटी लंडनमधून बिझनेस, मॅनेजमेंट, मार्केटिंग अँड सर्व्हिसेज या विषयामध्ये शिक्षण घेतले आहे. बहियाची एकूण संपत्ती किती आहे, हे कळू शकलेली नाही. पण त्याच्या कुटुंबाची एकूण संपत्ती 4 हजार कोटी रुपये असल्याचे म्हटले जात आहे.
कृति सेनॉनची एकूण संपत्ती किती आहे?
अभिनेत्री कृती सेनॉनची एकूण संपत्ती जवळपास 82 कोटी रुपये इतकी आहे. यंदा जुलै महिन्यामध्ये कृतिने अलिबाग शहरामध्ये 2 हजार स्क्वेअर फुटांचा भूखंड खरेदी केला आहे. शहरातील एका उत्कृष्ट ठिकाणी हा भूखंड आहे आणि मांडवा जेट्टीपासून 20 मिनिटांपेक्षा कमी अंतरावर हे ठिकाण आहे.
दरम्यान कृति सेनॉनच्या आगामी प्रोजेक्टबाबत सांगायचे झाले तर ती 'दो पत्ती' सिनेमामध्ये दुहेरी भूमिका निभावत आहे. हा सिनेमाची कथा 'मनमर्जियां' फेम कनिक ढिल्लनने लिहिली आहे. सिनेमाची कहाणी घरगुती हिंसाचार या विषयावर आधारित आहे.
(नक्की वाचा: अभिषेकसोबतच्या नात्याच्या अफवांवर निमरतची पहिलीच प्रतिक्रिया - हे सगळं रोखणं माझ्या हातात नाही)