जाहिरात

अभिषेकसोबतच्या नात्याच्या अफवांवर निमरतची पहिलीच प्रतिक्रिया - हे सगळं रोखणं माझ्या हातात नाही

Abhishek Bachchan and Aishwarya Rai Divorce: अभिनेता अभिषेक बच्चन आणि निमरत कौरने 'दसवीं' सिनेमामध्ये काम केले आहे. हा सिनेमा रिलीज होऊन काही वर्ष झाले आहेत. पण गेल्या काही दिवसांमध्ये अभिषेक बच्चनसोबत तिचे नाव जोडले जात आहे.  

अभिषेकसोबतच्या नात्याच्या अफवांवर निमरतची पहिलीच प्रतिक्रिया - हे सगळं रोखणं माझ्या हातात नाही

Abhishek Bachchan and Aishwarya Rai Divorce: ऐश्वर्या राय-बच्चन आणि अभिषेक बच्चन बॉलिवूडमधील पॉवर कपल मानले जाते. पण हे जोडपे विभक्त होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. ऐश्वर्या-अभिषेक गेल्या बऱ्याच दिवसांपासून सार्वजनिक ठिकाणी एकत्रित दिसले नाहीत. बिग बी अमिताभ बच्चन यांच्या घरी एखादी पार्टी असो किंवा एखादा सार्वजनिक कार्यक्रम हे दोघं कधीही एकमेकांसोबत दिसत नाहीत. त्यामुळे या दोघांमधील संबंध ताणले गेले आहेत, अशी चर्चा सुरू आहे. यादरम्यान अभिषेक बच्चन आणि निमरत कौर रिलेशनशिपमध्ये असल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या आहेत. ऐश्वर्या राय - अभिषेक बच्चन यांच्या नात्यामध्ये निमरतमुळे मिठाचा खडा पडलाय, असेही म्हटले जात आहे. या अफवांवर अखेर निमरत कौरने पहिल्यांदाच स्पष्टपणे प्रतिक्रिया दिलीय. 

Janhvi Kapoor : श्रीदेवीची लेक होणार माजी मुख्यमंत्र्यांच्या घरची सून? नव्या फोटोनं चर्चेला उधाण

(नक्की वाचा: Janhvi Kapoor : श्रीदेवीची लेक होणार माजी मुख्यमंत्र्यांच्या घरची सून? नव्या फोटोनं चर्चेला उधाण)

अभिषेक बच्चनबाबत निमरतने नेमके काय म्हटलंय?

अभिषेक बच्चन आणि निमरत कौरने 'दसवीं' सिनेमामध्ये एकत्रित काम केले आहे. 2022मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तेव्हा जितकी या जोडीची चर्चा झाली नाही तितकी आता होत आहे. कारण अभिषेक बच्चनसोबत निमरतचे नाव जोडले जात आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, निमरतने या अफवांवर प्रतिक्रिया देत म्हटलंय की, "मी काहीही केले तरी लोक तेच म्हणणार जे त्यांना म्हणायचंय. अशा पद्धतीच्या चर्चा रोखणे माझ्या नियंत्रणात नाहीय. त्यामुळे मी माझ्या कामावरच लक्ष केंद्रीत करण्यास प्राधान्य देत आहे".  

मी पॅरालायज्ड झालेय? खरंच? हसणं-बोलण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचा आलिया भटने असा घेतला समाचार

(नक्की वाचा: मी पॅरालायज्ड झालेय? खरंच? हसणं-बोलण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचा आलिया भटने असा घेतला समाचार)

अफवांमुळे अभिषेक बच्चन नाराज?

ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांबाबत अभिषेक बच्चन त्रासल्याचे दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्टपणे दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच अभिषेक बच्चन एयरपोर्टबाहेर दिसला होता. यादरम्यान त्याने प्रसिद्धी माध्यमांसमोर हात जोडले आणि आता बास झाले, असे म्हटले आणि तो तेथून बाहेर पडला. 

घटस्फोटाच्या चर्चेमध्ये या अभिनेत्रीशी जोडलं जातंय अभिषेकचं नाव, लग्नाच्या प्लॅनवर तिनं दिलं उत्तर!

(नक्की वाचा: घटस्फोटाच्या चर्चेमध्ये या अभिनेत्रीशी जोडलं जातंय अभिषेकचं नाव, लग्नाच्या प्लॅनवर तिनं दिलं उत्तर!)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com