Kabhi Khushi Kabhie Gham Ladoo : बॉक्सऑफिसवर गाजलेल्या 'कभी खुशी कभी गम' सिनेमामध्ये चार बालकलाकारही झळकले होते. यामध्ये शाहरुख खानच्या बालपणीची भूमिका आर्यन खान, शाहरुख खानच्या मुलाची भूमिका जिब्रान खान, जॉनी लीवरच्या मुलाची भूमिका त्यांचाच मुलगा जॅसी लीवर आणि ऋतिक रोशनच्या बालपणीची भूमिका कविश मजुमदारने निभावली होती. आर्यन खान आणि जॅसी लीवर कोणत्या-न्-कोणत्या कारणांमुळे कायम चर्चेत असतात तर जिब्रान खान अभिनेता म्हणून 'इश्क विश्क रिबाऊंड' (Ishq Vishk Rebound) सिनेमामध्ये झळकला होता. पण कविश मजुमदार सध्या काय करतोय? तो आता कसा दिसतो? असा प्रश्न सिनेरसिकांकडून कायम विचारला जात होता. दरम्यान कविशचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, 23 वर्षांनंतर त्याला ओळखणे चाहत्यांना कठीण ठरतंय.
(नक्की वाचा: खासगी व्हिडीओ लीक करण्याची आर्यन खानने दिली होती धमकी, अनन्या पांडेची धक्कादायक माहिती)
ऋषिक रोशनच्या बालपणीची भूमिका साकारणारा 'लड्डू' सध्या काय करतोय?
'कभी खुशी कभी गम' सिनेमा रिलीज होऊन आता 23 वर्ष पूर्ण झाली आहेत. 23 वर्षांमध्ये कविशचा लुक पूर्णपणे बदलला आहे, त्याला ओळखणंही कठीण ठरत आहे. 'कभी खुशी कभी गम' सिनेमानंतर कविशने अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री इलियाना डिक्रूजसोबत 'मैं तेरा हीरो' सिनेमामध्येही काम केले. तर 'गौरी तेरे प्यार में' सिनेमामध्ये कविशने सहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका बजावली. दरम्यान कविशला विनोदी भूमिका आवडतात आणि आजही तो नाटकांमध्ये काम करतो.
(नक्की वाचा: Karan Arjun Re-release: करण -अर्जुनचा होणार पुनर्जन्म, ऋतिकनं सांगितला अजरामर डायलॉगचा किस्सा)
'लड्डू'चा बदलला लुक
कविशने रितेश देशमुखच्या 'बँकचोर' सिनेमामध्येही काम केले आहे. कविशचा लहानपणीचा लुक अतिशय गोंडस होता. पण त्याचा आताच लुक प्रचंड शॉकिंग आहे. चाहत्यांना त्याला ओळखणंही कठीण ठरतंय.
(नक्की वाचा: ऐश्वर्या राय अभिषेक बच्चनसोबत आहे इतकी एकनिष्ठ, हा आहे मोठा पुरावा)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world