विकी कौशलचा 'छावा' चित्रपट 'या' तारखेला होणार रिलीज, का बदलली रिलीज डेट?

विकी कौशलचा 'छावा' चित्रपट डिंसेबर 2024 मध्ये रिलीज होणार होता. मात्र चित्रपटाची तारिख एक आठवड्याआधी अचानक बदलण्यात आली. जाणून घेऊया काय आहे कारण? कधी होणार चित्रपट रिलीज?

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

यावर्षी स्त्री-2, सिंघम अगेन सारखे अनेक सुपरहिट चित्रपट रिलीज झाले, बॉक्स ऑफिसवर झळकले आणि छप्परफाड पैसेही कमावले. या सिनेमांच्या रांगेत पुष्पा 2 आणि विकी कौशलचा छावा चित्रपटही होता. मात्र, विकी कौशलचा  'छावा' चित्रपट या महिन्यात (डिसेंबर) रिलीज होणार नसून, थेट पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे. चित्रपटाची तारिख एक आठवड्याआधी अचानक बदलण्यात आली आणि डिसेंबरऐवजी पुढे ढकलण्यात आली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा  'छावा' चित्रपट ऐतिहासिक कालखंडावर आधारित आहे. या चित्रपटात विकी   कौशलसोबत  पुष्पा फेम आणि साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदनाही झळकणार आहे. चित्रपटात विकी संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाचा ट्रेलरही जोरदार चर्चेत होता. त्यामुळे सगळेच चित्रपट रिलीज व्हायची आतुरतेने वाट बघत होते. याच महिन्यात (डिसेंबर) पुष्पा 2 आणि छावा चित्रपट रिलीज होणार होता. पुष्पा 2,  5 डिसेंबरला रिलीज होणार असून, 30 नोव्हेंबरपासून चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगलाही सुरुवात झाली आहे.

(नक्की वाचा: 'पुष्पा 2' चे अ‍ॅडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, रिलीजपूर्वीच मोडले 'या' सुपरहिट सिनेमांचे रेकॉर्ड)

 छावा चित्रपट 6 डिसेंबरला बॉक्स ऑफिसवर झळकणार होता. मात्र, 5 डिसेंबरला पुष्पा 2 रिलीज होणार आहे. याच कारणामुळे,  छावा चित्रपटाची रिलीज डेट बदलण्यात आली आहे. दिनेश विजन यांच्या मॅडॉक्स फिलम्सने याची निर्मिती केली आहे.  पुष्पा 2 च्या रिलीजच्या पार्श्वभूमीवर छावा चित्रपटाच्या निर्मात्यांनी हा निर्णय घेतला आहे आणि नवीन डेट रिलीज केली आहे. त्यामुळे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे. 

(नक्की वाचा: मुस्लीम अभिनेत्रीनं केलं हिंदू बॉयफ्रेंडशी लग्न, धर्म वेगळा असल्यानं होता विरोध)

छावा चित्रपटाची नवीन रिलीज डेट

बहुप्रतिक्षित 'छावा' चित्रपट आता 14 फेब्रुवारी 2025 रोजी बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. विशेष म्हणजे, 19 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. त्यामुळे या  तारखेला विशेष महत्त्व दिले आहे. विक्की कौशलसोबत या चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदान्ना, छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई भोसले यांच्या भूमिकेत दिसणार आहे त्याचबरोबर बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना, आशुतोष राणा आणि दिव्या दत्ता यांसारखे दिग्गज कलाकारही या चित्रपटात आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे. 
 

Advertisement