Pushpa 2 Advance Booking: 'पुष्पा 2 द रूल' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. शनिवारपासून म्हणजेच 30 नोव्हेंबरपासून चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली. 'पुष्पा'चा पहिला भाग प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्या भागाची बरीच उत्सुकता होती. Pushpa 2 The Rule हा पुष्पाचा दुसरा भाग 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली असून रिलीजपूर्वीच या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अल्लु अर्जुन-रश्मिका मंदनाचा 'पुष्पा 2' हा बहुचर्चित-बहुप्रतीक्षित चित्रपट कधी प्रदर्शित होणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले होते.अखेर हा सिनेमा 5 डिसेंबर रोजी बॉक्सऑफिसवर झळकत आहे. पुष्पा 2 सिनेमासह यातील कलाकारांच्याही जोरदार चर्चा सुरू आहेत. हा चित्रपट प्रदर्शित झाला नसला तरी, चित्रपटाच्या ट्रेलरनेच प्रेक्षकांच्या मनात आगळं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. 'पुष्पा 2'ची भारताबाहेरही जोरदार चर्चा सुरू आहेत. रिलीजपूर्वीच या चित्रपटाने अमेरिकेत सुमारे 1.4 दशलक्ष डॉलर्सची कमाई केली आहे. सुकुमार यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग शनिवारपासून म्हणजेच 30 नोव्हेंबरपासून सुरू झाले आहे. या चित्रपटाचे बजेट जवळपास 400 कोटी रुपये इतके आहे.
(नक्की वाचा: Hashtag Tadev Lagnam : सुबोध भावेला मिळतोय मुलींकडून नकार, पाहिला का व्हिडीओ?)
कोणकोणत्या भाषांमध्ये 'पुष्पा 2' रिलीज होणार?
'पुष्पा 2 द रुल' हा चित्रपट 5 डिसेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि बंगाली इत्यादी भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. अॅडव्हान्स बुकिंग आणि रिलीज होण्यापूर्वीची कमाई पाहता हा चित्रपट वर्ष 2024मधील ब्लॉकबस्टर आणि सुपरहिट चित्रपट ठरू शकतो.
(नक्की वाचा: Standup Against Street Harassment: घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ऐश्वर्या रायचा 'तो' व्हिडीओ चर्चेत)
पुष्पा 2 ने 'या' चित्रपटांचे मोडले रेकॉर्ड
- 'बाहुबली 2: द कन्क्लुजन'ने रिलीज होण्यापूर्वी 500 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली होती.
- आरआरआर चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वी 600 कोटी रुपयांहूनहून अधिक कमाई केली होती.
- कल्की या चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वी 600 कोटी रुपयांहूनहून अधिक कमाई केली होती.
- सालार या चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वी 350 कोटी रुपयांहूनची कमाई केली होती.
- मात्र पुष्पा 2 ने रिलीजपूर्वीच 1000 कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world