Bollywood News: झिंगाट होवून सैराट! दारुच्या नशेत हॉटेलमध्ये सापडला बॉलिवूडचा मराठी स्टार

पोलिसा येऊनही नशेत असलेल्या अभिनेत्याची अरेरावी काही थांबत नव्हती.

जाहिरात
Read Time: 2 mins

बॉलिवूडमधला मराठी चेहर म्हणून ओळखीचा असलेल्या एका अभिनेत्याने शरमेने मान खाली घालावी असे कृत्य केले आहे. एकेकाळी गोविंदा आणि सलमान खानला ही आपल्या शरीरयष्टीनं टक्कर देणारा हा अभिनेता 'बॉलिवूडचा टार्झन' म्हणून परिचित आहेत. तो अभिनेता म्हणजे हेमंत बिर्जे. हेमंत बिर्जे यांनी एका कृतीने आपलं नाव खराब केलं आहे. त्याला दारूच्या नशेत गोंधळ घालणं चांगलंच महागात पडलं आहे. ही घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. या घटनेनंतर हेमंत बिर्जे यांना पोलीसांना ताब्यात घेतले आहे.  

हेमंत बिर्जे यांनी एका कार्यक्रमासाठी 90,000 रुपये घेतले होते. उत्तर प्रदेशातील अलीगढमध्ये एका महोत्सवासाठी बिर्जे यांना बोलावण्यात आलं होतं. आयोजकांनी त्यांना त्यांच्या मागणी प्रमाणे भरगोस मानधनही दिलं होतं. हा कार्यक्रम 12 ऑक्टोबरला अलीगढला होणार होता. त्या ठिकाणी अभिनेता हेमंत बिर्जे पोहोचला ही होता. पण त्याने कार्यक्रम स्थळी न जाता पहिले हॉटेल गाठले. त्या ठिकाणे त्याने हवी तेवढी दारू ढोसली. दाऊ पिऊन ते अक्षरश: हॉटेलच्या रूममध्ये लोळत असल्याचं समोर आले. त्यामुळे आयोजकांना धक्काच बसला. 

नक्की वाचा - Shah Rukh Khan: फक्त या कोडने पाहू शकता ‘Ba***ds of Bollywood' चे ‘अनसीन' फुटेज, खुद्द शाहरुखनेच...

कार्यक्रमाच्या वेळेत अभिनेता हेमंत बिर्जे  न पोहोचल्याने आयोजकांचे टेन्शन वाढले होते. त्यांनी त्यांना शोधत हॉटेलवर पोहोचले. तेव्हा ते मद्यधुंद अवस्थेत आढळले. आयोजकांनी दिलेले पैसे परत मागताच हेमंत बिर्जे भडकले.  त्यांनी 'पैसे परत मिळणार नाहीत' म्हणत प्रचंड धिंगाणा घातला. वाद इतका वाढला की, 'टार्झन'चा हॉटेलमधील 'जंगल'मधील गोंधळ थांबवण्यासाठी पोलिसांना बोलावण्याची वेळ आली. पोलीस ही तातडीने त्या ठिकाणी दाखल झाले. त्यामुळे तिथे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. 

नक्की वाचा - VIDEO: 'मला नियम शिकवू नका', चिमुकल्याचा अमिताभ बच्चन यांच्याशी उद्धटपणा; नेटकऱ्यांचा संताप

पोलिसांनी येऊनही नशेत असलेल्या अभिनेत्याची अरेरावी काही थांबत नव्हती असा आरोप आयोजकांनी केला आहे.  आयोजकांनी त्याच्यावर असभ्य वर्तनाचा आरोप केला. अखेर पोलिसांनी कठोर भूमिका घेत हेमंत बिर्जे यांच्यासह त्यांच्या 3 साथीदारांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्या सर्वांना  पोलीस ठाण्यात नेण्यात आले. याप्रकरणी आयोजकांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. दारूच्या नशेत बेधुंद होऊन एका मोठ्या अभिनेत्यानं केलेली ही कृती नक्कीच दुर्दैवी म्हणावी लागेल. 

Advertisement