Bobby Deol News: अॅनिमल सिनेमा आणि आश्रम वेबसीरिजमुळे चर्चेत आल्यानंतर बॉबी देओलची आणखी एक व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आवडली. आर्यन खानच्या वेबसीरिज 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' मध्ये बॉबीनं सिनसृष्टीतील कलाकाराची भूमिका साकारली, 'अजय तलवार' असे त्यांच्या पात्राचं नाव होतं. बॉबीने साकारलेल्या या पात्रास चाहत्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. दरम्यान बॉबी देओलनं एका मुलाखतीमध्ये स्वतःच्या जीवनाशी संबंधित मोठी माहिती चाहत्यांना सांगितली होती. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचा मुलगा बॉबी देओलने म्हटलं होतं की, "या जगामध्ये एक व्यक्ती अशी आहे जी आईवडिलांपेक्षाही जास्त महत्त्वाची आहे".
(नक्की वाचा: Dharmendra News: हेमा मालिनी पहिल्यांदा प्रेग्नेंट असताना लपून भेटल्या सासूबाई, या भेटीत जे घडलं ते प्रचंड...)
बॉबी देओलच्या आयुष्यातील महत्त्वाची व्यक्ती कोण?
बॉबी देओलची मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होतेय, ज्यामध्ये त्याने खासगी आयुष्याशी संबंधित माहिती शेअर केली होती. बॉबीने मुलाखतीत सांगितलं की, "आयुष्यात त्याच्यासाठी पत्नीचं स्थान खूप महत्त्वाचं आहे. सर्वांसाठी पालकांचं स्थान आधी असते, पण माझ्यासाठी पत्नी महत्त्वाची आहे. कारण जीवनात तिने मला कायम साथ दिलीय. म्हणून माझे आईवडिलांवर प्रेम नाही, असा अर्थ होत नाही. पण पत्नी माझ्यासाठी सर्वस्व आहे".
(नक्की वाचा: Dharmendra Birthday: धर्मेंद्र यांचा 90वा वाढदिवस! फार्महाऊसवर होणार सेलिब्रेशन, सनी-बॉबीचा चाहत्यांसाठी मोठा निर्णय?)
बॉबी आणि तान्याची लव्हस्टोरी
बॉबी देओल आणि तान्या देओलनं वर्ष 1996मध्ये प्रेमविवाह केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तान्याला पाहताच क्षणी बॉबी तिच्यावर फिदा झाला होता. यानंतर तिला तो वारंवार कार्ड्स पाठवायचा. रात्रीअपरात्री बॉबी तान्याला कॉल करायचा. केवळ तिचा आवाज ऐकण्यासाठी बॉबी अशा चित्रविचित्र वेळेस फोन करायचा, असे तान्यानेही काही मुलाखतींमध्ये सांगितलं होतं. तान्याला देखील हळूहळू बॉबी आवडू लागला आणि यानंतर दोघांनी लग्न केलं. आयुष्यातील प्रत्येक चढ-उतारादरम्यान दोघांनी कायम एकमेकांना साथ दिली.