जाहिरात

Dharmendra: हेमा मालिनी पहिल्यांदा प्रेग्नेंट असताना लपून भेटल्या धर्मेंद्र यांच्या आई, भेटीत जे घडलं ते...

Hema Malini And Dharmendra: हेमा मालिनींची धर्मेंद्र यांच्या आई सतवंत कौर यांच्यासोबतच्या पहिल्या भेटीमध्ये काय घडलं होतं.

Dharmendra: हेमा मालिनी पहिल्यांदा प्रेग्नेंट असताना लपून भेटल्या धर्मेंद्र यांच्या आई, भेटीत जे घडलं ते...
"Hema Malini: हेमा मालिनी आणि त्यांच्या सासूसोबतच्या पहिल्या भेटीमध्ये काय घडलं?"

Hema Malini And Dharmendra: ड्रीम गर्ल हेमा मालिनी (Hema Malini) तरुणवयामध्ये इतक्या सुंदर होत्या की पाहताच क्षणी त्यांच्यावर कोणीही फिदा होईल. धर्मेंद्र (Dharmendra) देखील हेमा यांच्या प्रेमामध्ये इतके बुडाले होते की ते आपण विवाहित असून चार मुलांचे वडील आहोत याचाही त्यांना विसर पडला होता. विवाहित असतानाही धर्मेंद्र यांनी हेमा यांच्यासोबत लग्न केले. दरम्यान हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी आणि त्यांच्या कुटुंबापासून आदरयुक्त अंतर राखून ठेवलं होतं. सासूबाई सतवंत कौर यांच्याशी झालेली हेमांची पहिली भेटही खूपच संस्मरणीय होती. हेमा यांनी त्यांच्या पुस्तकात या घटनेचा उल्लेख केला आहे. दुसरीकडे हेमा मालिनी यांची धर्मेंद्र यांच्या आई सतवंत कौर यांच्यासोबतची पहिली भेट अतिशय संस्मरणीय ठरली होती. हेमा यांच्या आपल्या आत्मचरित्रामध्ये या भेटीचा उल्लेख केलाय.

हेमा मालिनी आणि त्यांच्या सासूची पहिली भेट

हेमा मालिनी यांनी आपले आत्मचरित्र 'हेमा मालिनी: बियाँड द ड्रीम गर्ल' मध्ये सांगितलंय की, सासू सतवंत कौर यांच्यासोबतच्या पहिल्या भेटीदरम्यान त्या प्रचंड चिंतेत होत्या, पण या भेटीनंतर त्या खूप खूशही झाल्या. धरमजींच्या आई देखील अतिशय दयाळू होत्या. मला आठवतंय जेव्हा मी प्रेग्नेंट होते आणि मोठी मुलगी ईशाला जन्म देणार होते, त्यावेळेस जुहूतील डबिंग स्टुडिओमध्ये त्या मला भेटण्यासाठी आल्या होत्या. त्यांनी घरामध्ये कोणालाही काहीही सांगितलं नव्हतं. मी पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांनी मला मिठी मारुन म्हटलं की बेटा कायम खूश राहा. माझ्यावर त्या खूश होत्या, याच विचाराने मी आनंदी होते.

Dharemndra News: जेव्हा धर्मेंद्रंच्या घरी आयकर विभागाचा छापा पडला, आशा पारेखही होत्या रडावर; नेमकं काय घडलं?

(नक्की वाचा: Dharemndra News: जेव्हा धर्मेंद्रंच्या घरी आयकर विभागाचा छापा पडला, आशा पारेखही होत्या रडावर; नेमकं काय घडलं?)

प्रकाश कौर यांचाही करतात आदर

हेमा मालिनी यांनी आत्मचरित्रामध्ये असंही म्हटलंय की, धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांचाही त्या आदर करतात. त्यांच्या मुली देखील प्रकाश कौर आणि त्यांच्या मुलांचाही आदर करतात. हेमा यांनी पुस्तकात म्हटलंय की, "मी कधीही प्रकाश कौर यांच्याबाबत काहीही प्रतिक्रिया दिली नाही, पण मी त्यांचा खूप आदर करते. माझ्या मुली देखील धरमजींच्या कुटुंबाचा आदर करतात. जगाला माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, पण या गोष्टी इतरांसाठी नाहीत.

Dharmendra Birthday: धर्मेंद्र यांचा 90वा वाढदिवस! फार्महाऊसवर होणार सेलिब्रेशन, सनी-बॉबीचा चाहत्यांसाठी मोठा निर्णय?

(नक्की वाचा: Dharmendra Birthday: धर्मेंद्र यांचा 90वा वाढदिवस! फार्महाऊसवर होणार सेलिब्रेशन, सनी-बॉबीचा चाहत्यांसाठी मोठा निर्णय?)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com