Govinda News: गोविंदाला या मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत लग्न करायचे होते, पत्नीसमोर म्हणाला की: सुनीता नसती तर...

Actor Govinda News: अभिनेता गोविंदाला बॉलिवूडमधील या अभिनेत्रीशी लग्न करण्याची इच्छा होती. कोण आहे ती हीरोइन? पाहा तिचे 10 सुंदर फोटो...

जाहिरात
Read Time: 2 mins
"Govinda News: गोविंदाला या बॉलिवूडमधल्या या मराठमोळ्या अभिनेत्री करायचं होतं लग्न"

Actor Govinda News: अभिनेता गोविंदाने 90चं दशक प्रचंड गाजवलं आणि सिनेरसिकांच्या मनामध्ये स्वतःचे पक्के स्थान निर्माण केले. त्यावेळेस गोविंदाच्या सिनेमांमसह गाणी आणि त्याची जबरदस्त डान्स स्टाइल खूप चर्चेत होती. करिअर यशाच्या शिखरावर असताना गोविंदाने सुनीतासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. मुलीच्या जन्मानंतर त्याने लग्नाबाबतची माहिती सर्वांसमोर आणली. यादरम्यान गोविंदाचे नाव कित्येक अभिनेत्रींसोबत जोडले गेले होते. 'हीरो नंबर 1'ने त्याच्या जीवनातील ही गोष्ट कधीही काहीही सांगितली नसली तरी त्याला बॉलिवूडमधील (Bollywood News In Marathi) एका मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत लग्न करण्याची इच्छा होती. एका मुलाखतीमध्ये गोविंदाने याचा उल्लेखही केला होता. ही अभिनेत्री दुसरीतिसरी कोणी नसून 'धकधक गर्ल माधुरी दीक्षित' (Madhuri Dixit) आहे.

गोविंदाने एका डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्येही म्हटलं होतं की, त्याला माधुरी दीक्षितसोबत लग्न करण्याची इच्छा होती. पण अभिनेत्री माधुरी दीक्षितने प्रपोजलचे उत्तर दिले नाही. 

'बड़े मिया छोटे मिया' सिनेमामध्ये एका गाण्याकरिता गोविंदा आणि माधुरीने एकत्रित काम केले होते. 

यादरम्यान गोविंदाने माधुरीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवा होता. पण धकधक गर्लने त्याकडे दुर्लक्ष केले. 

काही वेळानंतर माधुरी दीक्षितने डॉक्टर श्रीराम नेनेसोबत लग्न केले आणि परदेशात स्थायिक झाली. 

इतकंच नव्हे तर एकदा गोविंदाने त्याची पत्नी सुनीता अहुजासमोरही माधुरीवरील प्रेमाचा उल्लेख केला होता.  

मुलाखतीमध्ये गोविंदा पत्नी सुनीतासमोर सांगत आहे की, सुनीता नसती तर नक्कीच मी माधुरीचा विचार केला असतो. 

माधुरी दीक्षितची क्रेझ चाहत्यांमध्ये आजही कायम आहे. 

डॉ. नेनेंसोबत लग्न केल्यानंतर काही वर्षांनंतर माधुरी मायदेशीर परतली. 

माधुरी दीक्षित सध्या मोठ्या पडद्यावर जास्त दिसत नाही. पण टीव्ही, वेबसीरिज तसेच सोशल मीडियावर सक्रिय असते.