- 1980 च्या दशकात अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना हे सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते होते
- सलीम-जावेद या लेखक जोडीचे मानधन अमिताभ बच्चन पेक्षा जास्त असून ते एका चित्रपटासाठी 21 लाख रुपये घेत होते
- 1990 पर्यंत अमिताभ बच्चनचे मानधन एका चित्रपटासाठी 1 कोटी रुपयांपर्यंत वाढले
Highat paid Indian Actors 80s: आजच्या काळात शाहरुख खान किंवा सलमान खान एका चित्रपटासाठी 150 ते 250 कोटी रुपये मानधन घेतात. मात्र, 1980 च्या दशकात चित्रपटसृष्टीचे आर्थिक गणित पूर्णपणे वेगळे होते. त्या काळात 'अँग्री यंग मॅन' अमिताभ बच्चन हे सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते होते. त्यांच्याच तोडीचे मानधन राजेश खन्ना ही घेत होते. पण या दोन स्टार्स पेक्षा ही जास्त मानधन घेणारी एक जोडी चित्रपट सृष्टीत होती. ती म्हणजे सलीम-जावेद या लेखक जोडी. यांचे मानधन कोणत्या ही स्टार्सपेक्षा अधिक असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
1979-80 च्या सुमारास अमिताभ बच्चन एका चित्रपटासाठी 20 लाख रुपये मानधन घेत असत. त्याच वेळी बॉलीवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांचे मानधन 12 लाख रुपये होते. विशेष म्हणजे, प्रसिद्ध लेखक जोडी सलीम-जावेद एका चित्रपटासाठी 21 लाख रुपये घेत होते. जे अमिताभ यांच्यापेक्षाही 1 लाख रुपयांनी अधिक होते. 80 च्या दशकात अमिताभ बच्चन यांचा दबदबा कायम राहिला. दशकाच्या शेवटी त्यांचे मानधन 50 लाखांपर्यंत पोहोचले होते.
तर 1990 पर्यंत त्यांनी एका चित्रपटासाठी 1 कोटी रुपये आकारण्यास सुरुवात केली. दुसरीकडे, राजेश खन्ना यांनी रोमँटिककडून ॲक्शन चित्रपटांकडे वळण घेतले तरी, ते कमाईच्या बाबतीत अमिताभ यांच्या मागेच राहिले. राजेश खन्ना यांनी चित्रपटसृष्टीला अनेक हिट चित्रपट दिले, पण मानधनाच्या शर्यतीत ते 12 लाखांवर अडकले होते. शत्रुघ्न सिन्हा आणि ऋषी कपूर यांचे मानधन साधारण 10 लाख रुपये इतके होते. 'ड्रीम गर्ल' हेमा मालिनी देखील त्या काळी एका चित्रपटासाठी 10 लाख रुपये मानधन घेत असत.
80 चे दशक संपेपर्यंत अमिताभ बच्चन यांची लोकप्रियता इतकी वाढली की त्यांनी आपले मानधन थेट 50 लाखांवर नेले. पुढे 1990 च्या काळात ते एका चित्रपटासाठी 1 कोटी रुपये घेणारे पहिले भारतीय सुपरस्टार बनले होते. त्या आधी सलीम-जावेद या जोडीचा स्टारडम इतका मोठा होता की, त्यांना मुख्य अभिनेत्यापेक्षा जास्त मानधन दिले जात असे. राजेश खन्ना यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक बदल केले, मात्र त्यांना अमिताभ बच्चन यांच्या इतके मानधन कधीच मिळवता आले नाही.
इतर स्टार्सची स्थिती
- राजेश खन्ना: 12 लाख रुपये
- सलीम-जावेद (लेखक जोडी): 21 लाख रुपये
- शत्रुघ्न सिन्हा: 10 लाख रुपये
- ऋषी कपूर: 10 लाख रुपये
- हेमा मालिनी: 10 लाख रुपये