बॉलिवूडमध्ये यश अपयश हे त्या अभिनेत्याच्या किंवा अभिनेत्रीच्या चित्रपटाने केलेल्या कमाईवर ठरते. अभिनेत्रींच्या यशाबाबत बोलायचं झालं तर सध्या एका अभिनेत्रीची जोरदार चर्चा सुरू आहे. ती अभिनेत्री म्हणजे हमखास यश असं समिकरणचं झालं आहे. विशेष म्हणजे तिने बॅट टू बॅट तीन चित्रपट हीट झाले आहेत. या चित्रपटांनी छप्परफाड कमाई केली आहे. हा तीन चित्रपटांच्या कमाईचा आकडा 3 हजार कोटींच्या घरात आहे. सध्या या अभिनेत्रीची बॉलिवूडमध्ये धूम आहे असं म्हटलं तर चूकीचं ठरणार नाही.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलं नाहीत का? ही अभिनेत्री तशी बॉलिवूडमधली नाही. तिचा संबंध तसा दक्षिण भारतातल्या चित्रपटांबरोबर आहे. दक्षिणेतल्या बड्या स्टार पैकी ती एक आहे. तिने आपल्या करिअरची सुरूवातही दाक्षिणात्य चित्रपटातूनच केली आहे. तुम्ही आता तर नक्कीच ओळखलं असते. ती अभिनेत्री रश्मिका मंदाना आहे. सध्या बॉलिवूडमध्ये हीच रश्मिका मंदाना लकी चार्म ठरत आहे. रश्मिकाचे बॅक टू बॅक तीन चित्रपट सुपर डुपर हीट ठरले आहेत. त्यांची कमाई ही छप्पर फाडके आहे. तिच्या या तीन चित्रपटांनी एक दोन नव्हे तर तब्बल तीन हजार कोटींचा गल्ला कमावला आहे.
ट्रेंडिंग बातमी - Emotional story: आई वडील भारतात, लेकीला दुबईत फाशी, शेवटचा फोन कॉल अन्...
दाक्षिणात्य चित्रपटांची क्विन असलेली रश्मिका हिंदी चित्रपटांसाठी लकी ठरत आहे. त्याला कारणही तसेच आहे. तीने लगोपाठ दिलेले हिट चित्रपट. या हिट चित्रपटात पहिला चित्रपट आहे एनिमल. एनिमल हा चित्रपट 2023 साली प्रदर्शित झाला होता. अॅक्शनपट म्हणून या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर जोरदार मुसंडी मारली होती. वर्ल्ड वाईड या चित्रपटाने 900 कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाच्या पहिल्या शो पासून शेवटच्या शोपर्यंत सर्व हाऊस फूल होते. या तिचा बॉलिवूडमधला पहिला हीट चित्रपट ठरला.
त्यानंतर 2024 हे वर्ष रश्मिका मंदानासाठी लकी ठरलं. या वर्षी तिने श्रीवल्ली बनत आपल्या चाहत्यांना अशी काही भूरळ घातली की तिचा पुष्पा-2 जबरदस्त हिट ठरला. या चित्रपटाने खऱ्या अर्थाने छप्पफाड कमाई केली. हा मुळ चित्रपट तेलगू असला तरी या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीने सर्वात जास्त कमाई केली. या चित्रपटाने वर्ल्ड वाईड 1800 कोटीचा गल्ला जमा केला. आधी सिनेमागृहात आणि नंतर ओटीटीवर या चित्रपटाने धुमाकूळ घातला. जगभरात या चित्रपटाचे कौतूक झाले. मोठ्या प्रमाणात या चित्रपटाला जागतीकस्तरावर यश मिळालं.
ट्रेंडिंग बातमी - महिलांसाठी खुशखबर! 'छावा' चित्रपट मोफत पाहता येणार, कधी अन् कुठे? जाणून घ्या
त्यानंतर यावर्षी म्हणजे 2025 साली तिचा छावा हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ज्या पद्धतीने अपेक्षा केली जात होती त्या प्रमाणे या चित्रपटाला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाचे पहिल्या तीन दिवसाचे कलेक्शन पाहाता रश्मिका पुन्हा एकदा लकी चार्म ठरल्याचे सिद्ध झाले आहे. या चित्रपटाने केवळ तीन दिवसात 116.5 कोटी कमावले आहेत. त्यामुले रश्मिकाचा डंका सध्या बॉलिवूडमध्ये असल्याचे चित्र आहे. यानंतर रश्मिकाचा पुढचा चित्रपट हा सलमान खान बरोबर आहे. सिकंदर असं या चित्रपटाचं नाव असून तो ही सुपर डुपर हीट होणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे.