Shakti Kapoor Wife 8 Photo: शक्ती कपूरच्या पत्नीचे 8 फोटो, मराठी अभिनेत्रीसोबत थाटला संसार;तर मेहुणी सुपरस्टार

Shakti Kapoor Wife 8 Photos: ज्येष्ठ अभिनेते शक्ती कपूर यांच्या लग्नाची गोष्ट एखाद्या सिनेमाच्या कथेप्रमाणेच आहे. शक्ती कपूर यांच्या पत्नीचे हे 8 फोटो पाहिले आहेत का?

जाहिरात
Read Time: 2 mins
"Shakti Kapoor Wife 8 Photos: शक्ती कपूर यांच्या पत्नीचे हे 8 फोटो पाहिले आहेत का?"

Shakti Kapoor Wife 8 Photos: बॉलिवूडमध्ये जेव्हा जेव्हा खतरनाक खलनायक किंवा जबरदस्त कॉमिक टायमिंगबाबत चर्चा होते, तेव्हा ज्येष्ठ अभिनेते शक्ती कपूर यांचे नाव नक्कीच घेतले जाते. 80 आणि 90च्या दशकात त्यांनी अशा काही भूमिका साकारल्या आहेत की, शक्ती कपूर मोठ्या पडद्यावर दिसताच प्रेक्षक त्यांचा तिरस्कार करू लागायचे आणि हीच त्यांच्या अभिनयाची खरी पावती होती. 700 हून अधिक सिनेमांमध्ये काम केलेल्या शक्ती कपूर यांनी आपल्या कारकिर्दीत खलनायकापासून ते कॉमेडियनपर्यंत प्रत्येक भूमिकेत स्वतःला सिद्ध केले आहे. त्यांच्या अभिनयाची शैली इतकी वेगळी होती की, ते प्रत्येक सिनेमात आपला ठसा उमटवायचे.

शक्ती कपूर यांनी आपल्या करिअरची सुरुवात 1970 च्या दशकात केली होती, पण त्यांना खरी ओळख 80 च्या दशकात मिळाली. 

‘कुर्बानी', ‘हिम्मतवाला', ‘तोहफा' आणि ‘अंदाज अपना अपना' यासारख्या सिनेमातील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. विशेषतः त्यांची ‘क्राइम मास्टर गोगो' ही व्यक्तिरेखा आजही चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. त्यांनी जितक्या सहजतेने खलनायकाच्या भूमिका केल्या, तितकीच दर्जेदार कॉमेडीही केली.

Advertisement

खासगी आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर शक्ती कपूर यांची लव्ह स्टोरी एखाद्या फिल्मी कथेपेक्षा कमी नाही. त्यांनी शिवांगी कोल्हापुरे यांच्याशी लग्न केले, ज्या स्वतः एक अभिनेत्री आणि गायिका आहेत.

असे म्हटले जाते की,  या दोघांच्या लग्नाला कुटुंबाकडून परवानगी नव्हती, पण काळाच्या ओघात सर्व गोष्टी व्यवस्थित मार्गी लागल्या 

(नक्की वाचा: Aamir Khan: आमिर खानने स्वीकारली आयुष्यातील ती चूक, गौरी स्प्रॅटबाबत केले मोठे विधान; लग्न न टिकण्याचंही सांगितलं कारण)

शक्ती कपूर यांच्या पत्नी शिवांगी या प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांच्या बहीण आहेत. म्हणजेच नात्याने पद्मिनी कोल्हापुरे या शक्ती कपूर यांच्या मेहुणी आहेत, एकेकाळी त्या देखील सुपरस्टार होत्या. 

(नक्की वाचा : Rahul Roy: ब्रेन स्ट्रोकनंतरची जगण्याची लढाई! आशिकी फेम राहुल रॉयच्या त्या VIRAL REEL मागील धक्कादायक सत्य समोर)

Advertisement

शक्ती कपूर यांची मुलगी श्रद्धा कपूर आज बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. श्रद्धाने 'आशिकी 2' यासारख्या सुपरहिट सिनेमातून आपली ओळख निर्माण केली आणि आज तिने इंडस्ट्रीमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. शक्ती कपूर यांचा मुलगा सिद्धांत कपूर हा देखील सिनेसृष्टीत सक्रिय आहे.

विशेष म्हणजे शक्ती कपूर यांनी पडद्यावर जरी नकारात्मक आणि खतरनाक भूमिका साकारल्या असल्या, तरी खऱ्या आयुष्यात ते एक 'फॅमिली मॅन' आहेत.

Advertisement

टीव्ही शोमध्येही शक्ती कपूर आवर्जून हजेरी लावतात. टॅलेंट आणि मेहनतीच्या जोरावर कोणताही कलाकार कोणतीही भूमिका सहजरित्या पार पाडू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे शक्ती कपूर असल्याचे मानले जाते.