Bollywood News: ना शाहरूख, ना सलमान, ना अमिताभ!, राजपाल यादवच्या मदतीला उभा राहिला 'हा' रियल हिरो

"जेव्हा आपला एखादा सहकारी कठीण काळातून जात असतो, तेव्हा सर्व निर्माते, दिग्दर्शक आणि सहकलाकारांनी एकत्र उभे राहिले पाहिजे असं ही तो म्हणाला.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • बॉलिवूडचा विनोदी अभिनेता राजपाल यादव आर्थिक अडचणीत असून चेक बाऊंस प्रकरणामुळे तिहार जेलमध्ये आहे
  • अभिनेता सोनू सूदने राजपाल यादव यांना आपल्या आगामी चित्रपटात महत्त्वाची भूमिका दिली असून मदत केली आहे
  • सोनू सूदने राजपाल यादव यांच्यासाठी आगाऊ मानधन दिले असून ही मदत त्यांच्या कामाचा सन्मान आहे असे सांगितले
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
मुंबई:

बॉलिवूडचा विनोदी अभिनेता राजपाल यादव सध्या आर्थिक अडचणीत आहे. चेक बाऊंस प्रकरणात सध्या तो तिहार जेलमध्ये आहे. आपल्याकडे पैसे नाही. मी काय करू असा प्रश्न त्याने स्वत:चा स्वत:ला विचारला आहे. अशा वेळी त्याच्या मदतीला कोणी येतं की नाही असा प्रश्न होता. अशा स्थितीत बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आणि समाजसेवक सोनू सूद याने पुन्हा एकदा आपल्या माणुसकीचे दर्शन घडवले आहे. सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत असलेले विनोदी अभिनेते राजपाल यादव यांच्या मदतीसाठी सोनू सूद पुढे आला आहे. 

सोनूने आपल्या आगामी चित्रपटात राजपाल यादव यांना महत्त्वाची भूमिका दिली आहे. शिवाय ही मदत नसून त्यांचा सन्मान असल्याचे त्याने म्हटले आहे. सोनू सूदने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर राजपाल यादव यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. शिवाय एक भावूक पोस्ट लिहिली आहे. सोनू म्हणाला, "राजपाल यादव हे आपल्या इंडस्ट्रीतील अत्यंत गुणी कलाकार आहेत. त्यांनी अनेक वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. कधीकधी काळ कठीण असतो. पण त्यात कलाकाराच्या प्रतिभेचा दोष नसतो. राजपाल आता माझ्या चित्रपटाचा भाग असतील. ही कोणतीही 'चॅरिटी' (मदत) नसून त्यांच्या कामाप्रती असलेला सन्मान आहे असं तो म्हणाला आहे. 

नक्की वाचा - VIDEO: बायकोला मॉलमध्ये सोडून नवरा एकटाच निघाला घरी; अभिनेत्रीसोबत नेमकं काय घडलं?

सोनू सूदने पुढे आवाहन केले की, "जेव्हा आपला एखादा सहकारी कठीण काळातून जात असतो, तेव्हा सर्व निर्माते, दिग्दर्शक आणि सहकलाकारांनी एकत्र उभे राहिले पाहिजे. आपण फक्त एक इंडस्ट्री नसून एक कुटुंब आहोत, हे दाखवून देण्याची हीच वेळ आहे." सोनूने राजपाल यांना मानधनाची काही रक्कम आगाऊ (Signing Amount) देऊन त्यांच्या कामाला सुरुवात करून दिली आहे. या मदतीमुळे राजपाल यांना मोठा दिलासा मिळणारा आहे. पाच कोटींचे कर्ज सध्या राजपाल यादव यांच्यावर आहे. 

नक्की वाचा - Sachin Pilgaonkar: ट्रोलर्सवर संतापण्याऐवजी सचिन पिळगावकरांनी चक्क आशीर्वाद का दिले? वाचा पडद्यामागचं सत्य

राजपाल यादव गेल्या काही काळापासून आर्थिक तंगी आणि कामाच्या कमतरतेमुळे त्रस्त होते. सोनू सूदच्या या निर्णयाचे सोशल मीडियावर त्यांचे जोरदार स्वागत होत आहे. चाहत्यांनी सोनूचे आभार मानताना म्हटले की, "जेव्हा गरज होती तेव्हा बॉलिवूडमधील इतर कलाकार गप्प होते, पण सोनूने पुन्हा एकदा मन जिंकले. सोनूची एक कृती सर्वांनाच आपलीशी करून गेली आहे. त्याच्या या भूमीकेचे सगळीकडे स्वागत होत आहे. सोनू पुढे आला आहे अजून काही बॉलिवूडमधील कलाकार राजपाल यादवच्या मदतीसाठी पुढे येतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article