जाहिरात

VIDEO: बायकोला मॉलमध्ये सोडून नवरा एकटाच निघाला घरी; अभिनेत्रीसोबत नेमकं काय घडलं?

Actress Gautami Deshpande' VIDEO: गौतमीने शेअर केलेल्या व्हिडिओनुसार, हे दोघेही एका मॉलमध्ये फिरत होते. फिरता फिरता स्वानंद इतका तंद्रीत होता की, काही वेळापूर्वी तो आपली बॅग विसरला होता.

VIDEO: बायकोला मॉलमध्ये सोडून नवरा एकटाच निघाला घरी; अभिनेत्रीसोबत नेमकं काय घडलं?

अभिनेत्री गौतमी देशपांडे आणि तिचा नवरा स्वानंद तेंडुलकर यांच्यातील मजेशीर केमिस्ट्री चाहत्यांना नेहमीच आवडते. मात्र, नुकताच गौतमीने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये स्वानंदच्या विसराळूपणामुळे तिची मोठी फजिती झाली असती. मॉलमध्ये खरेदीसाठी गेलेला स्वानंद आपली बायको सोबत आहे हेच विसरला आणि एकटाच पार्किंगमध्ये जाऊन गाडी काढून घराकडे निघण्याच्या तयारीत होता.

नेमकं काय घडलं?

गौतमीने शेअर केलेल्या व्हिडिओनुसार, हे दोघेही एका मॉलमध्ये फिरत होते. फिरता फिरता स्वानंद इतका तंद्रीत होता की, काही वेळापूर्वी तो आपली बॅग विसरला होता. त्यानंतर तो मागे वळून न पाहता थेट मॉलच्या बाहेर पडला. गौतमी त्याच्या मागे धावत पार्किंगपर्यंत पोहोचली. स्वानंद गाडीत बसून ती सुरू करणार इतक्यात गौतमीने तिथे पोहोचून त्याला 'मी सोबत आहे' याची आठवण करून दिली.

व्हिडिओमध्ये गौतमी स्वानंदला म्हणते, "स्वानंद, दरवाजा उघड... मी इतका वेळ सोबत आहे हे विसरलास तू?" त्यावर स्वानंद मजेशीर उत्तर देतो, "मी गाडी काढून तुला फोनच करणार होतो, आता अति करू नकोस." स्वानंदच्या या विसराळूपणावर गौतमीने हसत हसतच डोक्याला हात लावला आहे.

चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स

हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. एका युजरने कमेंट केली की, "हा नक्कीच रोहित शर्माचा फॅन असेल. " दुसऱ्या एका युजरने गमतीने म्हटले की, "नवस केला तरी तो फेडावा लागतो, नाहीतर असं होतं!" तर आणखी एकाने म्हटलं की, "बायको विसरला पण गाडी कुठे पार्क केलीय ते बरोबर लक्षात आहे." 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com