Akshaye Khanna Dhurandhar Movie: आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर सिनेमा आणि अक्षय खन्नाच्या अभिनयाचं कौतुक करणाऱ्या कलाकारांची यादी भलीमोठी होत जातेय. या यादीमध्ये अक्षयची एक्स गर्लफ्रेंड तारा शर्माच्याही नावाचा समावेश आहे. ताराने सोशल मीडियावर अक्षय खन्नाचं कौतुक करणारी पोस्ट शेअर केलीय. पण तुम्हाला माहितीये का तारा शर्मा कोण आहे? असे म्हणतात की तारासोबत अक्षय खन्ना कधीकाळी रिलेशनशिपमध्ये होता आणि त्याने हे नाते खरं असल्याचंही सांगितलं होतं.
तारा शर्माने केलं अक्षय खन्नाचं कौतुक
ताराने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर भलीमोठी पोस्ट लिहून अक्षयला त्याच्या यशाबाबत शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्याच्या मेहनतीचं कौतुकही केलंय. तारानं पोस्टमध्ये लिहिलंय की, "खूप-खूप अभिनंदन अक्षय! मी सिनेमा पाहिलेला नाही. पण इन्स्टाग्रामवरील संपूर्ण फीडमध्ये धुरंधरच्याच पोस्ट दिसतायेत. विशेषतः ते गाणं आणि तुझी धमाकेदार एण्ट्री. तुला आणि तुझ्या टीमला शुभेच्छा.
ताराने पुढं असंही सांगितलं की, दोघंही लहानपणापासून एकमेकांना ओळखत आहेत. शाळेच्या दिवसांत कित्येक नाटकांमध्ये काम केलंय आणि तेव्हाच समजलं होतं की अक्षय अभिनय क्षेत्रातच करिअर करणार. तुझ्यासाठी मी खरंच खूप खूश आहे, कारण शांतपणे केलेल्या मेहनतीचे फळ तुला आता मिळतंय".
(नक्की वाचा: कोण होता रहमान डकैत? Dhurandhar मध्ये Akshaye Khanna ने साकारलीय भूमिका, स्वत:च्या आईचीच केली होती हत्या)
अक्षय खन्ना सोशल मीडियावर नाही
ताराने अक्षय खन्नासोबतचा जुना फोटो शेअर करत म्हटलंय की, हा फ्लॅशबॅक फोटो तुझ्या नो फोटो ऑरापूर्वीचा आहे. मला माहितीय की तु कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नाहीयस. पोस्टमध्ये ताराने संपूर्ण टीमसह रणवीर सिंग, अर्जुन रामपाल, आर माधवन, दिग्दर्शक आदित्य धरलाही शुभेच्छा दिल्या आहेत.
अक्षय खन्नाने तारा शर्मासोबतच्या नात्याबाबत नेमकं काय म्हटलं होतं?
अक्षय खन्ना आणि तारा शर्मा एकमेकांचे खास मित्र आहे. दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याचीही माहिती समोर आली होती. वर्ष 2007 मध्ये करण जौहरने आपल्या शोमध्ये नात्याबाबत प्रश्न विचारला होता, त्यावेळेस अक्षय खन्नाने म्हटलं होतं की, “हे नातं खरं होतं.” रिपोर्ट्सनुसार अक्षय खन्ना आणि तारा शर्मा दोन वर्ष रिलेशनशिपमध्ये होते आणि यानंतर त्यांचे ब्रेकअप झालं, पण आजही दोघं एकमेकांचे चांगले मित्र आहेत.