ती सध्या काय करते ? जितेंद्रसोबत अभिनय, शत्रुघ्न सिन्हांसोबत अफेअर; विनोद खन्नांवरही होते जीवापाड प्रेम

70 च्या दशकातील या अभिनेत्रीने चित्रपटप्रेमींना वेड लावलं होतं. त्याकाळी ही अभिनेत्री सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री होती. 1972 साली जन्मलेल्या या अभिनेत्रीने अवघ्या 15 व्या वर्षी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्याकाळी या अभिनेत्रीचं आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्यातील अफेरची जोरदार चर्चा होती.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

अभिनेत्री रिना रॉय यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. पदार्पणाच्या चित्रपटात ही अभिनेत्री विशेष छाप सोडू शकली नव्हती मात्र 1976 साली प्रसिद्ध झालेल्या 'नागिन' चित्रपटामुळे तिला अपार प्रसिद्धी मिळाली होती. या अभिनेत्रीचे विनोद खन्ना यांच्यावर जीवापाड प्रेम होते आणि ती राजेश खन्नांप्रमाणेच विनोद खन्ना हे देखील स्टार होते असे सांगायची. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

रिना रॉय यांची नागिन चित्रपटातील भूमिका गाजल्यानंतर ती प्रसिद्धीच्या झोतात आली होती. रिना रॉय यांनी 1973 साली रोमँटीक कॉमेडी चित्रपट 'जैसे को तैसा' मध्ये भूमिका केली होती. मात्र यशाची चव चाखण्यासाठी रिना रॉय यांना वाट पाहावी लागली. 1975 साली प्रसिद्ध झालेल्या धमाकेदार चित्रपट 'जख्मी'मधील त्यांच्या अभिनयाचे कौतुक झाले होते. या चित्रपटामुळे त्यांना वेगळी ओळख मिळणे शक्य झाले. 

नक्की वाचा : प्रसिद्ध अभिनेत्रीने डेअरिंग दाखवले; लंपट अब्जाधीशाला तुरुंगात पाठवले

1976 साली प्रसिद्ध झाल्यानंतर रिना रॉय यांचं नशीबच पालटलं होतं. या चित्रपटातील अभिनयामुळे  चित्रपट रसिकांना वेड लावलं होतं. या मल्टीस्टारर चित्रपटात रिना रॉय यांचा अभिनय चाहत्यांच्या कायम स्मरणात राहिला. यानंतर त्यांना एकामागोमाग एक चांगले चित्रपट मिळायला लागले. रिना रॉय यांनीही मिळालेल्या संधीचे सोने केले आणि त्याकाळातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्रीपर्यंतचा प्रवास पाहिला. 

नक्की वाचा :"माझे मौन दुर्बलतेचे लक्षण नाही...', धनश्री वर्माचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

रिना रॉय या त्यांच्या अभिनयाप्रमाणेच त्यांच्या खासगी जीवनातील घडामोडींमुळेही कायम चर्चेत असायच्या. काही दिवसांपूर्वी रिना रॉय यांना 'द कपिल शर्मा' शोमध्ये बोलावण्यात आले होते. यावेळी त्यांना विनोद खन्ना यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. रिना रॉय यांनी त्यावर म्हटले, विनोद खन्ना हे त्या काळी सगळ्यात हँडसम अभिनेते होते. त्यांना पाहण्यासाठी तरुणींच्या रांगा लागायच्या. राजेश खन्ना यांच्यानंतर इतकी क्रेझ पाहिलेले विनोद खन्ना होते असं रिना रॉय यांनी म्हटले. 

Advertisement

नक्की वाचा :शाहरुख खानच्या बायकोनं इस्लाम धर्म स्वीकारला? Viral फोटोचं सत्य काय?

रिना रॉय आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यात अफेअर असल्याच्याही त्याकाळी जोरदार चर्चा होत्या. शत्रुघ्न सिन्हा हे पूनम सिन्हा यांच्यासोबत विवाह झालेला असतानाही रिना रॉय यांच्यासोबतच्या मधुर संबंधांबद्दल अनेकदा खुलेपणाने बोलले आहेत. एका इंटरव्ह्यूमध्ये शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटले होते की अशी दुहेरी नाती जपणं हे मुश्कील असतं. 

रिना रॉय आणि जितेंद्र ही जोडी त्याकाळी प्रचंड गाजली होती. 1980 साली प्रसिद्ध झालेल्या 'आशा' चित्रपटात त्या जितेंद्र  यांच्यासोबत दिसल्या होत्या. या चित्रपटातील गाणीही बरीच गाजली होती. ‘शीशा हो या दिल हो आखिर टूट जाता है…' हे याच चित्रपटातील गाणं असून हे गाणं आजही अनेकांना आवडतं. 

Advertisement

रिना रॉय यांचं खरं नाव सायरा अली होतं. जानी दुश्मन, अर्पण, ज्योती, नसीब, सनम तेरी कसम हे रिना रॉय यांचे लक्षात राहणारे चित्रपट आहेत. कारकीर्द ऐन भरात असताना रिना रॉय यांनी पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहसीन खान यांच्यासोबत निकाह केला बोता. कराचीमध्ये हा निकाह झाला होता. या दोघांना जन्नत नावाची मुलगी असून या लग्नानंतर रिना रॉयने अभिनय सोडून दिला होता. मात्र या दोघांचं लग्न फार काळ टीकलं नाही. या दोघांनी तलाक घेतला ज्यानंतर रिना रॉय मुलीसह भारतात परतली होती. 

Topics mentioned in this article