जाहिरात

Dhanashree Verma : "माझे मौन दुर्बलतेचे लक्षण नाही...', धनश्री वर्माचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

Yuzvendra Chahal-Dhanashree Verma : धनश्रीने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करून अफवा पसरवणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

Dhanashree Verma : "माझे मौन दुर्बलतेचे लक्षण नाही...', धनश्री वर्माचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा याच्या घटस्फोटाच्या अफवा अनेक दिवसांपासून पसरवल्या जात आहेत. या सर्व चर्चांदरम्यान धनश्री वर्माने पहिल्यांदाच मौन सोडले आहे. धनश्रीने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करून अफवा पसरवणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

धनश्रीने आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिलं की,

"गेले काही दिवस माझ्यासाठी आणि कुटुंबासाठी अत्यंत कठीण होते. बिनबुडाचे निराधार, लिखाण हे वेदनादायी आहे. विद्वेष पसरवणाऱ्या ट्रोलर्समुळे माझे चारीत्र्यहनन होत आहे."

"मी नाव कमावण्यासाठी अनेक वर्ष संघर्ष केला आहे. माझे मौन म्हणजे हतबलता नसून ते खंबीरतेचे प्रतीक आहे. नकारात्मक गोष्टी ऑनलाईन पद्धतीने वेगाने पसरतात मात्र इतरांच्या भल्यासाठी काम करण्यासाठी धाडस आणि ममत्व गरजेचे असते."

"मी सत्यावर विश्वास ठेवून पुढे जात आहे. मी माझी मूल्ये कधीही सोडणार नाही. सत्याला, पुराव्याची गरज नसते ते नेहमी सर्वश्रेष्ठ ठरते."

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

Latest and Breaking News on NDTV

(नक्की वाचा: Yuzvendra Chahal आणि Dhanashree Verma वेगळे होणार? 'या' निर्णयानंतर चर्चेला उधाण)

युजवेंद्र चहलची पोस्ट

4 जानेवारी 2025ला चहलने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या स्टोरीमुळे घटस्फोटाच्या चर्चा अधिकच वाढल्या होत्या. "कठोर मेहनत लोकांच्या चारित्र्यावर प्रकाश टाकण्याचे काम करते. तुम्हाला तुमचा प्रवास माहिती असतो. तुमच्या वेदना तुम्हाला माहिती असतात.  इथंवर पोहोचण्यासाठी तुम्ही काय केलंय हे तुम्हाला माहिती आहे. जगाला माहिती आहे. तुम्ही खंबीरपणे उभे राहा. आईवडिलांना अभिमान वाटावा म्हणून तुम्ही घाम गाळून काम केलंय. अभिमानी मुलाप्रमाणे कायम खंबीरपणे उभे राहा", अशा आशयाची पोस्ट त्याने शेअर केली होती. पण याद्वारे त्याला नेमके काय म्हणायचे आहे, हे स्पष्टपणे कळू शकलेले नाही. 

(नक्की वाचा: युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री नेमके काय करते, किती आहे श्रीमंत?)

चहल आणि धनश्रीने 8 ऑगस्ट 2020 रोजी साखरपुडा केल्याची घोषणा केली. चार महिन्यांनंतर म्हणजे 22 डिसेंबर 2020 रोजी या जोडप्याने लग्नगाठ बांधली. पारंपरिक भारतीय रितीनुसार चहल आणि धनश्रीचा ग्रँड विवाहसोहळा पार पडला. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com