Border 2 created history on 26 January: बॉलिवूड अभिनेता सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टीचा बॉर्डर चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. देशप्रेम अन् भारत पाक युद्धावर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. २६ जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी या चित्रपटाने कमाईचा नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. ६८ वर्षीय सनी देओलच्या या चित्रपटाने चौथ्या दिवशीच्या कमाईत धुरंधर, छावा, टायगर 3 या चित्रपटांना मागे टाकले आहे.
२६ जानेवारी रोजी बॉर्डर या चित्रपटाने चौथ्या दिवशी (प्रजासत्ताक दिनी) ₹६३.५९ कोटींचा निव्वळ बॉक्स ऑफिस कलेक्शन नोंदवला, जो प्रजासत्ताक दिनी आतापर्यंतचा सर्वाधिक कलेक्शन आहे. या कमाईसह चित्रपटाचा चार दिवसांचा एकूण निव्वळ नफा १९३.४८ कोटींवर पोहोचला आहे. बॉर्डरच्या या ब्लॉकबस्टर कमाईने अनेक हिट चित्रपटांना धक्का दिला आहे.
Ratnagiri News: चांदण्याने छळले, सोसाट्याच्या वाऱ्याने मासे पळवले; रत्नागिरीतील मच्छिमार वैतागले
बॉर्डर चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन
- पहिला दिवस (शुक्रवार): ३२.१० कोटी एनबीओसी
- दुसरा दिवस (शनिवार): ४०.५९ कोटी
- तिसरा दिवस (रविवार): ५७.२० कोटी
- चौथा दिवस (सोमवार, प्रजासत्ताक दिन): ६३.५९ कोटी
- एकूण: १९३.४८ कोटी
बॉर्डर २ ने चौथ्या दिवशी ६३.५९ कोटीचे कलेक्शन केले. पण तुम्हाला माहिती आहे का की २०२५ च्या ब्लॉकबस्टर 'छावा'ने चौथ्या दिवशी २४ कोटी कलेक्शन केले होते, तर रणवीर सिंगच्या ब्लॉकबस्टर चित्रपटाने चौथ्या दिवशी सुमारे २३ कोटी कमावले होते. सलमान खानच्या 'टायगर ३' चा चौथ्या दिवशीचा ५९ कोटींचे कनेक्शन 'बॉर्डर ३' साठी एक मोठे आव्हान होते.
पण सनी देओलने हा आकडा ओलांडून एक नवीन टप्पा गाठला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीमुळे चित्रपटाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला, ज्यामुळे चित्रपटगृहे आणि उत्साही प्रेक्षक हाऊसफुल्ल झाले. देशभक्तीने, शौर्य आणि पराक्रम असे मिश्रण असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.