जाहिरात

Shocking News: प्रसिद्ध मराठमोठ्या रिलस्टारचा मृत्यू! मीडिया जगतात खळबळ; मायलेकाच्या व्हिडिओंनी लावलेलं वेड

प्रथमेश कदम या मुंबईचा राहणारा असून इंस्टाग्रा तसेच युट्यूबवरील प्रसिद्ध कंटेट क्रिएटर होता. प्रथमेशचे इंस्टाग्रामवर एक लाख 86 हजार इतके फॉलोअर्स होते. 

Shocking News: प्रसिद्ध मराठमोठ्या रिलस्टारचा मृत्यू! मीडिया जगतात खळबळ; मायलेकाच्या व्हिडिओंनी लावलेलं वेड

Marathi Social Media Star Prathmesh Kadam Death:  देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह सुरु असतानाच मराठी सोशल मीडिया जगतातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या मराठमोळ्या रिलस्टारचे दुःखद निधन झाले आहे. प्रथमेश कदम असं या रिलस्टारचे नाव असून त्याचा मित्र तसेच सोशल मीडिया स्टार प्रथमेशचा मित्र तन्मय पाटेकरने याबाबतची माहिती दिली आहे. 

मराठमोळ्या रिलस्टारचे निधन

सोशल मीडियावर आपल्या धमाकेदार डान्स अन् हटके कंटेटसाठी प्रसिद्ध असलेला रिलस्टार प्रथमेश कदम याचे दुःखद निधन झाले आहे. प्रथमेश कदम याच्या जवळच्या मित्राने त्याच्या मृत्यूची बातमी दिली आहे. प्रथमेश कदम या मुंबईचा राहणारा असून इंस्टाग्रा तसेच युट्यूबवरील प्रसिद्ध कंटेट क्रिएटर होता. प्रथमेशचे इंस्टाग्रामवर एक लाख 86 हजार इतके फॉलोअर्स होते. 

Mouni Roy: वृद्धाचे अश्लील चाळे, कमरेवर हात, गुलाब फेकले.. बॉलिवूड अभिनेत्रीसोबत गैरवर्तन, पोस्ट व्हायरल

सोशल मीडियावर डान्स, कॉमेडी व्हिडिओ तसेच अनेक म्युझिक अल्बममधून प्रथमेशने प्रसिद्धी मिळवली होती. तो त्याची आई प्रज्ञा कदम यांच्यासोबतही रिल बनवत होता. मायलेकाच्या भन्नाट व्हिडिओंनी हटके डान्सने नेटकऱ्यांना चांगलीच भुरळ घातली होती. प्रज्ञा कदम यासुद्धा सोशल मीडिया स्टार असून त्यांचेही तब्बल 50 हजार फॉलोअर्स आहेत. 

काय होती अखेरची पोस्ट?

याआधी डिसेंबर 2025मध्ये  प्रथमेशनेएक व्हिडिओ पोस्ट करत आपली फसवणूक झाल्याचे सांगितले होते. काही दिवसांपूर्वीच त्याने भावाची हळद लागली या त्याच्या नवीन गाण्याचा व्हिडिओ पोस्ट केला होता. हीच त्याची अखेरची पोस्ट ठरली. अशातच त्याच्या मृत्यूची बातमी आल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तू सदैव आठवणीत राहशील प्रथमेश, देवाघरी स्वतःची काळजी घे रे! खूप आठवण येईल तुझी Miss You Bhai, अशी भावुक प्रतिक्रिया त्याचा मित्र तन्मय पाटेकरने दिली आहे. 

Big Boss Marathi 6: 'बिग बॉस'च्या घरात सागर कारंडेने मळली तंबाखू? कुणी हेरली चलाखी? VIDEO व्हायरल

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com