Cannes Film Festival 2024: पायल कपाडिया यांच्या 'ऑल वी इमेजिन अॅज लाइट' सिनेमाने कान्स फिल्स फेस्टिव्हलमध्ये ग्रँड प्रिक्स पुरस्कार पटकावला आहे. 30 वर्षांमध्ये या फेस्टिव्हलच्या मुख्य स्पर्धेत पोहोचणारा भारतीय महिला दिग्दर्शकाचा हा पहिलाच भारतीय सिनेमा आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील पाल्मे डी'ओर पुरस्कारानंतर ग्रँड प्रिक्स पुरस्कार हा दुसऱ्या क्रमांकाचा प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो.
दुसरीकडे मल्याळम, इंग्रजी आणि हिंदी भाषेमध्ये चित्रित करण्यात आलेल्या या सिनेमाची कथा पायल कपाडिया यांनी लिहिली आहे. या सिनेमाची कहाणी नर्स प्रभा या पात्राच्या जीवनावर आधारित आहे. प्रभाचा पती तिच्यापासून राहत असतो आणि त्याच्याकडून तिला एक अनपेक्षित भेट मिळते, ज्यामुळे तिच्या आयुष्यामध्ये उलथापालथ होते. यामध्ये तिची सहकारी नर्स अनुचीही कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
(Cannes 2024: 'ऑल वी इमेजिन अॅज लाइट' सिनेमाने रचला इतिहास, जिंकला ग्रँड प्रिक्स पुरस्कार)
कान्स स्पर्धेच्या शर्यतीतील शेवटचा भारतीय सिनेमा
वर्ष 1983मध्ये प्रतिष्ठित पाल्मे डी'ओर पुरस्कारासाठी स्पर्धेच्या शर्यतीतील शेवटचा भारतीय सिनेमा म्हणजे निर्माते मृणाल सेन यांचा 'खारिज' हा सिनेमा होता. यापूर्वी एम.एस. सथ्यू यांचा 'गरम हवा' (1974), सत्यजित रे यांचा 'परश पत्थर' (1958), राज कपूर यांचा 'आवारा' (1953), व्ही शांताराम यांचा 'अमर भूपाली' (1952) आणि चेतन आनंद यांचा 'नीचा नगर' (1946) यासारख्या सिनेमांची कान्समधील स्पर्धेसाठी निवड झाली होती. 'नीचा नगर' हा वर्ष 1946मधील कान्समध्ये सर्वोच्च सन्मान मिळवणारा एकमेव भारतीय सिनेमा आहे. त्यावेळेस हा पुरस्कार ग्रां प्री डू फेस्टिव्हल इंटरनॅशनल डु फिल्म या नावाने ओळखला जात होता.
(नक्की वाचा: Cannes Chhaya Kadam नाकात नथ, डोळ्यात समाधानाचे अश्रू; छाया कदमचे कान्समध्ये कौतुक)
पायल कपाडिया कोण आहेत?
पायल कपाडिया यांचे वय 38 वर्षे आहे. त्यांच्या आई नलिनी मालिनी या देखील एक उत्तम कलाकार होत्या. पायल यांनी मुंबई शहरातील सेंट झेव्हियर्स कॉलेजमधून इकोनॉमिक्स विषयामध्ये पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. यानंतर त्यांनी फिल्म अँड टेलीव्हिजन इंस्टिट्युट ऑफ इंडिया येथून दिग्दर्शनाचे धडे घेतले.
यानंतर कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये वर्ष 2021मध्ये पायल दिग्दर्शित 'ए नाइट ऑफ नोइंग नथिंग' डॉक्युमेंट्रीला गोल्डन आय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वर्ष 2017मध्ये त्यांचा 'आफ्टरनून क्लाउड्स' सिनेमा हा भारतातर्फे कान्समध्ये पोहोचणारा एकमेव सिनेमा होता. कान्समध्ये सातत्याने आपली उपस्थिती दर्शवणाऱ्या पायल कपाडिया यांनी आता मोठा इतिहास रचला आहे.
(नक्की वाचा: अनसूया सेनगुप्ताने रचला इतिहास! कान्स फेस्टिव्हलमध्ये 'बेस्ट अॅक्ट्रेस' पुरस्कार जिंकणारी भारतीय अभिनेत्री)
VIDEO: छाया कदम यांच्यासाठी टाळ्यांचा कडकडाट, अभिनेत्रीसाठी खास स्टँडिंग ओव्हेशन