कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024 यंदा खऱ्या अर्थाने भारताने गाजवला आहे. जगभरातील मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांनी कान्स फेस्टिव्हलला उपस्थिती लावली. मात्र यंदाच्या कान्स फेस्टिव्हलमध्ये भारतीय सेलिब्रिटींचा जोरदार चर्चा झाली. कान्स फेस्टिव्हलमध्ये अनसूया सेनगुप्ताने इतिहास रचला आहे. बेस्ट अॅक्ट्रेसचा पुरस्कार जिंकणारी ती पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे. बल्गेरियाचे दिग्दर्शक कॉन्स्टेटिन बोजानोव यांच्या 'द शेमलेस' या हिंदी सिनेमात अनसूया प्रमुख भूमिकेत होती.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अन सर्टन रिगार्ड कॅटगरीमध्ये बेस्ट अॅक्ट्रेस पुरस्कार जिंकणारी अनसूया सेनगुप्ता पहिली भारतीय अभिनेत्री आहे. सर्व भारतीयांसाठी हा एक अभिमानाचा क्षण आहे. अनसूयाने आपला पुरस्कार Queer कम्युनिटीला समर्पित केला. दुसरीकडे पहिल्यांदाच भोजपुरी सिनेसृष्टीच्या कलाकाराने या फेस्टिव्हलला हजेरी लावली. प्रदीप पांडे चिंटूने रेड कार्पेटवर पाऊल ठेवत इतिहास रचला.
(नक्की वाचा- Cannes Chhaya Kadam नाकात नथ, डोळ्यात समाधानाचे अश्रू; छाया कदमचे कान्समध्ये कौतुक)
'द शेमलेस' सिनेमाचा प्रीमियर शो 17 मे रोजी कान्स फेस्टिव्हलमध्ये पार पडला. दोन महिलांची ही गोष्ट आहे. दोन्ही महिलांच्या शोषण आणि अडचणींभोवती फिरणारा हा सिनेमा आहे. सामाजिक बंधणे मोडून फेकण्याची इच्छा या महिलांची असते. अनसूया सेनगुप्ताने सिनेमात रेणुका नावांची भूमिका साकारली आहे. सिनेमा हिंदी भाषेत आहेत.
(नक्की वाचा: IPL मॅचनंतर शाहरुख खान हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांनी दिलं तब्येतीचं अपडेट)
कोण आहे अनसूया सेनगुप्ता?
अनसूयाने नेटफ्लिक्सवरील शो 'मसाबा मसाबा'चा सेट डिझाईन केला होता. आधी प्रोडक्शन डिझायनर आणि आता अभिनेत्री अशी ओळख अनसूयाने निर्माण केली आहे. द शेमलेस सिनेमा सध्या प्रेक्षकांना नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world