
Sharad Upadhye Post On Nilesh Sable: संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारा मराठी कॉमेडी शो चला हवा येऊ द्या-2 पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांना हसवले. आता पुन्हा एकदा हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने सर्वांनाच त्याची उत्सुकता लागली आहे. मात्र या नव्या शोमध्ये निलेश साबळेचा पत्ता कट झाला असून त्याची जागा अभिजीत खांडकेकरने घेतली आहे. निलेश साबळेचा कार्यक्रमामधून पत्ता कट झाल्यानंतर राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी लिहलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे. (Sharad Upadhye Slams Nilesh Sable Share Bad Experience On The Sets Of Chala Hawa Yeu Dya)
Chala Hawa Yeu Dya 2 : निलेश साबळेला नारळ, प्रसिद्ध अभिनेता करणार सूत्रसंचालन
शरद उपाध्ये यांची पोस्ट त्यांच्याच शब्दात...
"आदरणीय निलेशजी साबळे (Nilesh Sable)) आपल्याला 'हवा येऊ द्या'च्या दुस-या पर्वातून डच्चू देऊन त्या जागी अभिजीत खांडकेकरना आणल्याची बातमी आज पेपरमध्ये वाचली.वाईट वाटले पण आश्चर्य नाही. मला तुम्ही एकदा बोलवले होते. त्याप्रमाणे मी 11 वा.पोहोचलो. पण 3 वाजेपर्यंत त्या रुममध्ये कोणीच फिरकले नाही. मला पाणी हवे होते पण एकादोघांना सांगूनही ते आणतो म्हणून गेले ते आलेच नाहीत. मला रुम सोडू नका असे सांगितले होते.
निलेश तुम्ही इतर कलावंतांच्या रुममध्ये जाऊन गप्पा मारीत होतात पण माझ्या रुममध्ये डोकावलात ते थेट 4 वा.स्माईलही न देता स्टेजवर गेलात. इतरांचे शूटिंग खूप वेळ केलेत पण मला 6 वा. बोलावून घाईघाईत 15 मिनिटात सारे आटोपले. त्यावेळीही इतर कलावंत मधेमधे बोलत होते. माझा सारा दिवस फुकट गेला. एडिटींगमध्येही माझी उत्तरे गाळलीत. बाहेर आपली भेट झाली तेंव्हा वडीलांच्या नात्याने काही सल्ले दिले.
पण कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून आपल्या डोक्यात हवा गेली होती. दुस-याच्या विषयाबद्दल आदर ठेवायचा असतो पण तुम्ही बेपर्वा होतात. त्याच वेळी मला वाटले की अहंकार अति वाईट. गर्विष्ट माणसाचे अध:पतन होते. एखादी पोस्ट मिळाली की ताठा येतो आणि सर्वनाश होतो. स्टेजवर तुम्ही सा-यांना आपलेसे केले नाही. आपले सादरीकरणही आकर्षक होत नव्हते. या सा-याचा परिणाम म्हणजे तुम्हाला चॅनेलने बाहेर काढले.
( नक्की वाचा: सिरीयलमध्ये अभिनेत्री गोळीबारात जखमी, 'मंजू'साठी आजोबा गुपचूप साताऱ्यात पोचले )
"निलेशजी स्वभाव मनमिळाऊ असावा. सा-यांना सांभाळून घ्यावे मग सारे एकजुटीने काम करून कार्यक्रमाची चर्चा होईल अभिजीत खांडकेकर ही धुरा चांगली सांभाळतील. मला त्यांचा सहवास मिळाला आहे. आपण अनुभवी आहात.त्यांना मार्गदर्शन करा. इंडस्ट्रीत आपल्याविषयी असलेले गैरसमज आपल्या चांगल्या कामाने दूर करा.आपल्याला ईश्वराची साथ लाभो ही विनंती," असं शरद उपाध्ये यांनी म्हटलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world