Who Is Shikha Swaroop : 90 च्या दशकात टीव्हीवर आलेला राजेशाही शो ‘चंद्रकांता'तुम्हाला आठवतोय का?देवकीनंदन खत्री यांच्या कादंबरीवर आधारित हा शो फॅन्टसीने भरलेला होता.ज्यात दोन राजांमध्ये जगातील सर्वात सुंदर राजकुमारी चंद्रकांताला मिळवण्यासाठी युद्ध झालं होतं.दोन राज्यांच्या वैरावर प्रेमाची विजय मिळवणारी ही कहाणी टीव्हीवर प्रेक्षकांना खूप आवडली.त्या सुंदर आणि धाडसी राजकुमारीची भूमिका त्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री शिखा स्वरूप यांनी साकारली होती.त्या टायटल रोलमध्ये झळकल्या अन् बघता बघता प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनल्या.
31 वर्षानंतरही शिखा स्वरुप यांच्या सौंदर्याची होतेय चर्चा
ज्या वेळी शिखा स्वरूप अचानक पडद्यावरून गायब झाल्या, त्याचदरम्यान त्या करिअरच्या उंच शिखरावर होत्या.छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत त्यांना खूप पसंती मिळत होती.शिखा स्वरूप यांनी टीव्हीवर दुसरी इनिंग सुरू केली.त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या व्यक्तींसोबत काम केलं.शिखा स्वरूप यांनी आपल्या करिअरमध्ये यशाचं उंच शिखर गाठलं. 5 फूट 11 इंच उंचीच्या त्या एकमेव नामांकित अभिनेत्री होत्या.‘चंद्रकांता'यांनी अभिनय सोडून आता 31 वर्षे झाली आहेत. पण शिखा स्वरूप आजही आजही तितक्याच फिट,सडपातळ आणि आकर्षक दिसतात.
नक्की वाचा >> ऋतिकसोबत बॅकग्राऊंड डान्सर, 'तो' 27 वर्षात बनला सुपरस्टार, 34 व्या वर्षी मृत्यू, TV अभिनेत्रीसोबत होतं लफडं..
1998 मध्ये फेमिना 'मिस इंडिया'चा किताब जिंकला
मॉडेलिंगमधून करिअरची सुरुवात करणाऱ्या शिखा स्वरूप यांनी 1998 मध्ये 'फेमिना मिस इंडिया'इंटरनॅशनलचा किताब जिंकला होता.त्यांनी तब्बल 11 किंवा त्याहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. एका आजारामुळे त्यांना त्यांच्या करिअरला ब्रेक घ्यावा लागला, असं सांगितलं जातंय. त्यानंतर त्यांनी आर्मी पायलट राजीव लाल यांच्याशी लग्न करून संसार थाटला, अशाही बातम्या त्यावेळी झळकल्या. मात्र त्यांचे लग्न फार काळ टिकले नाही. त्यानंतर शिखा स्वरूप पुन्हा ग्लॅमर वर्ल्डमध्ये परतल्या. दुसऱ्या इनिंगमध्ये पुन्हा ‘चंद्रकांता'च त्यांचा आधार ठरला. ‘कहानी चंद्रकांता की' या मालिकेत त्या पुन्हा चंद्रकांता या भूमिकेत दिसल्या आणि ‘रामायण'मध्ये त्यांना कैकेयीची भूमिका करण्याची संधी मिळाली.