जाहिरात

Viral Video: 'पाहण्याच्या' कार्यक्रमात 'बसण्याचे' नियोजन, कांदे पोह्यांऐवजी मुलीने पेग भरून आणले

नवरी मुलगी घरातील किचनमधून हॉलमध्ये येत असते. तिच्या हातात दारूच्या ग्लासने भरलेला एक ट्रे असतो, नंतर असं काही घडतं..पाहा व्हायरल व्हिडीओ.

Viral Video: 'पाहण्याच्या' कार्यक्रमात 'बसण्याचे' नियोजन, कांदे पोह्यांऐवजी मुलीने पेग भरून आणले
Arrange Marriage Culture Shocking Video
मुंबई:

Today Shocking Video : मुलगा असो की मुलगी..लग्नाचं वय झाल्यावर प्रत्येकालाच वाटतं आपल्या आयुष्यात एक चांगला पार्टनर मिळावा. काहींचे लव्ह मॅरेज होतात, तर काही जण अरेंज मॅरेज करतात. जी मुलं अरेंज मॅरेजचा प्लॅन करतात, त्यांना मुलगी पाहण्यासाठी तिच्या घरी जावं लागतं. नटून-थटून गेलेली ही मुलं आपल्या कुटुंबीयांसह मुलीच्या घरी ऐटीत जातात. त्यावेळी मुलीच्या घरच्यांकडूनही मुलासह इतर पाहुण्यांचा जबरदस्त पाहुणचार केला जातो. काही लोक मुलाच्या पाहुण्यांना चविष्ट नाश्ता आणि त्यासोबत चहा किंवो कोल्ड्रिंक्स देतात. परंतु, नेपाळमधील एका कुटुंबाने हद्दच पार केली आहे. मुलीला पाहण्यासाठी घरी आलेल्या मुलाला आणि त्याच्या पाहुण्यांना कांदे-पोह्यांचा नाश्ता तर सोडाचा,एका मोठ्या ट्रे मध्ये चक्क दारूचे पेगच बनवून आणले. नेपाळमध्ये नवऱ्या मुलाला आणि वऱ्हाडी माणसांना दारूची पार्टी देण्याचा हा अनोखा प्रकार एका व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर आला आहे. 

मुलासह पाहुण्यांनीही दारूचा पेग घेतला आणि नंतर..

हा व्हिडीओ @SadhaMaanus एक्स हँडलवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय, कांदे पोह्यांचा ऐवजी 90-90
जमाना बदलतो आहे. मुलगी शिकली प्रगती झाली, असंही हॅशटॅगमध्ये लिहिलं आहे. व्हायरल व्हिडीओत पाहू शकता, नवरी मुलगी घरातील किचनमधून हॉलमध्ये येत असते. तिच्या हातात दारूच्या ग्लासने भरलेला एक ट्रे असतो. ती मुलगी हातात ट्रे घेऊन हॉलमध्ये येते. त्यानंतर ती मुलगी ट्रेमध्ये आणलेली दारू नवऱ्याला देते आणि त्यात कोल्ड्रिंक्सही मिक्स करते. दारूचा पेग पाहून नवऱ्या मुलासोबत आलेली माणसंही थक्क होतात. पण ती माणसंही दारूचा पेग घेत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. सर्वांनी दारूचा पेग घेतल्यानंतर नवरीही दारूचा ग्लास हातात घेऊन चिअर्स करत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. 

इथे पाहा हा भन्नाट व्हिडीओ

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून यूजर्सने कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका यूजरने कमेंट करत म्हटलंय,कपाळावर टिळा लावून हा उद्योग का करतायत?, अन्य एका यूजरने म्हटलंय, नेपाळी हिंदू आहेत. नेपाळमध्ये अशी प्रथा आहे. दुसऱ्या एकाने म्हटलंय, तोबा-तोबा, यासाठी दोन्ही मुलगा आणि मुलगी अट्टल 90 खोर पाहिजेत. तेव्हाच असे होऊ शकते. दोन बेवडे खानदान एकत्र आले, असंही एकाने म्हटलंय.तर आणखी एकाने म्हटलंय की, हिंदू राष्ट्रातीलच ना???आम्हीच पायंडा पाडतो मग आता महाराष्ट्रात,हल्लीची मुलं कुठे पोहे खाणारी अन मुली पोहे बनवणाऱ्या राहिल्यात,हे सगळ्यात सोपं काम होऊन जाईल.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com