छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित छावा चित्रपट (chhaava Movie) प्रदर्शित होण्यापूर्वीच वादात अडकला आहे. या चित्रपटातील एका दृश्यात छत्रपती संभाजी महाराज लेझीम खेळताना चित्रीत करण्यात आलं आहे. मात्र यावर शिवप्रेमींकडून आक्षेप नोंदविण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना फोन करून आक्षेप नोंदवला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आज उतेकरांनी राज ठाकरेंची भेट घेत या वादावर पडदा टाकला आहे. छत्रपती संभाजी महाराज लेझीम खेळतानाची दृश्य चित्रपटातून काढून टाकणार असल्याचं यावेळी उतेकरांनी सांगितलं. याशिवाय विशेष स्क्रिनिंग करून महत्त्वाच्या व्यक्तींना हा चित्रपट दाखवला जाईल.
उतेकरांनी घेतली राज ठाकरेंची भेट
गेल्या दोन दिवसांपासून हा वाद सुरू असताना त्यांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताने ते म्हणाले, राज ठाकरेंचं महाराजांवर खूप वाचन आहे. त्यामुळे चित्रपटात काय बदल करायला हवेत हे मी त्यांच्याकडून जाणून घेतलं. या चर्चेतून त्यांनी मला काही सूचना केल्या आहेत. त्या अत्यंत महत्त्वाच्या आहे. त्यांनी मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. महाराजांची ती दृश्य चित्रपटातून काढून टाकले जाईल.
नक्की वाचा - Chhava Movie : छावा सिनेमाला 'मराठी क्रांती मोर्चा'चा विरोध; तर संभाजीराजे छत्रपती म्हणाले, "अजूनही वेळ गेली नाही"
छावा कादंबरीचे अधिकृत हक्क घेऊ चित्रपटाची निर्मिती...
आम्हाला कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. पण नकळत कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर ती दृश्य काढून टाकू. महाराज लेझीम खेळतानाचं ते दृश्य चित्रपटाचा मोठा भाग नाही, त्यामुळे ते दृश्य आम्ही डिलिट करू. मात्र मला कळकळीने सांगायचं आहे की, आम्ही गेली चार वर्षे माझी टीम याविषयावर अभ्यास करतेय. छत्रपती संभाजी महाराजाचा पराक्रम, कर्तृत्व संपूर्ण जगाला कळावं हा या चित्रपटाचा हेतू आहे. म्हणूनच या चित्रपटाची निर्मिती केली. छावा हा संपूर्ण चित्रपट शिवाजी सावंतांच्या 'छावा' कादंबरीवर आधारित आहे. इतिहासाला वेगवेगळे पदर असतात. हेच जाणून आम्ही छावाचे अधिकृत हक्क घेऊन त्यावर चित्रपट बनवला. छावा कादंबरीत उल्लेख केल्यानुसार, छत्रपती संभाजी महाराज होळीचा उत्सव साजरा करायचे. होळीच्या आगीत हात घालून नारळ खेचून बाहेर काढायचे. लेझीम आपला पारंपरिक खेळ आहे. त्यात आधुकित स्टेप्स नाही.
छत्रपती संभाजी महाराज 20 वर्षांचे असताना लेझीम का खेळले नसतील का, असा प्रश्न उभा राहतो. महाराज बुराहणपूर जिंकून रायगडावर आले तेव्हा ते 20 वर्षांचे होते. त्यामुळे एक 20 वर्षांचा राजा त्याक्षणी लेझीम खेळलाही असेल. त्यात गैर काय? लेझीम आपला पारंपरिक खेळ आहे. मात्र शिवप्रेमींच्या भावना दुखावत असतील तर ती दृश्य नक्की डिलिट करू.