जाहिरात

Chhaava Video: छावाच्या सेटवर कामाला कशी सुरुवात व्हायची? अभिनेत्याने शेअर केला अंगावर काटा आणणारा VIDEO

Chhaava BTS Video : छावा सिनेमाच्या सेटवरील बीटीएस व्हिडीओ अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केलाय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. 

Chhaava Video: छावाच्या सेटवर कामाला कशी सुरुवात व्हायची? अभिनेत्याने शेअर केला अंगावर काटा आणणारा VIDEO
Chhaava BTS Video : छावा सिनेमाच्या सेटवरील बीटीएस व्हिडीओ पाहिला का?

Chhaava BTS Video : दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा 'छावा' सिनेमा बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहेत. छावा कादंबरीवर आधारित हा सिनेमा आहे. छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या जीवनपटावर आधारित छावा सिनेमामध्ये अभिनेता विकी कौशल याने मुख्य भूमिका साकारली आहे तर अभिनेत्री रश्मिका मंदाना महाराणी येसूबाई यांच्या भूमिकेत पाहायला मिळतेय. 14 फेब्रुवारी रोजी बॉक्सऑफिसवर रिलीज झालेल्या हा सिनेमा प्रदर्शनापूर्वी तसेच प्रदर्शनानंतरही काही गोष्टींमुळे वादात अडकला होता. तरीही सिनेमा पाहण्यासाठी थिएटरमध्ये प्रेक्षकांची गर्दी होत आहे. दरम्यान सिनेमाशी संबंधित काही-न्-काही व्हिडीओ तसेच फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नुकतेच अभिनेता संतोष जुवेकर यानंही छावा सिनेमाच्या सेटवरील शुटिंगदरम्यानचा एक व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा

छावा सिनेमाच्या सेटवर रोज कामाला कशी सुरुवात व्हायची, हे त्याने व्हिडीओच्या माध्यमातून दाखवले आहे. 

"सिंहासनाधीश्वर शिवपुत्र श्री श्री संभाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी. हर हर महादेव... जगदंब", अशा पद्धतीने शुटिंगची सुरुवात शंभूराजांच्या गर्जनेने व्हायची.  

(नक्की वाचा: Chhaava : छावा चित्रपटावर शिर्के कुटुंबीय आक्रमक, दिग्दर्शकाला राज्यात फिरु न देण्याचा इशारा)


व्हिडीओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये म्हटलंय की, "आठवणीतले छावाच्या shooting चे दिवस रोज कामाला सुरुवात व्हायची ती अशी शिव आणि शंभूराजांच्या गर्जनेने. जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे आणि ही गर्जना फक्त आमचा बाळाच (कला दिग्दर्शक बाळकृष्ण पाटील) द्यायचा" 

(नक्की वाचा: Chhava Movie: मुंबईकरांसाठी 'छावा' मोफत! 'या' मतदारसंघात फ्री शो; कधी अन् कसा पाहाल?)

कला दिग्दर्शकही झाला भावुक

हाच व्हिडीओ काही दिवसांपूर्वी कला दिग्दर्शक बाळकृष्ण पाटील यांनीही इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. प्रत्येकाला भावुक करेल, असे कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलंय. 

कला दिग्दर्शक बाळकृष्ण पाटील यांनी नेमके काय लिहिलंय? वाचा

"मी रायगड जगताना लाभले आम्हास भाग्य. दिवस-१६ जानेवारी १६८१ छत्रपती संभाजी महाराज राजभिषेक दिन. स्थळ-किल्ले रायगड.
होय, मी आपल्या महाराजांचा उत्सव सोहळा, त्यांची शौर्यगाथा डोळ्यांनी अनुभवलंय, होय मी महाराजांचा मावळा, होय मी राजांच्या राज्याभिषेक दिवशी मंत्रमुग्ध होतो, राज्याभिषेक दिनी शंभूगारद माझ्या मुखातून द्यायचा भाग्य मला लाभलंय... छत्रपती संभाजी महाराजांनी मला कौतुकाने दिलेली पाठीवरची थाप मला शिवमय करून गेलंय. मी जिवंतपणी पाहिलेला स्वर्ग, माझ्या राजांचा दरबार, माझ्या राजांचं वैभव, माझ्या धैर्यवान राजांचा दृढनिश्चयीपणा . मागच्या जन्मी केलेलं पुण्य is Directly Proportional to the शिवरायांच्या भूमीत मिळालेला जन्म "

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: