जाहिरात

Chhaava : छावा चित्रपटावरील शिर्के कुटुंबीयांच्या आक्षेपाला दिग्दर्शकांचं उत्तर, महत्त्वाच्या मुद्याकडं वेधलं लक्ष

Chhaava Movie: छावा चित्रपटावरी शिर्के कुटुंबीयांच्या आक्षेपांना दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी उत्तर दिलं आहे

Chhaava : छावा चित्रपटावरील शिर्के कुटुंबीयांच्या आक्षेपाला दिग्दर्शकांचं उत्तर, महत्त्वाच्या मुद्याकडं वेधलं लक्ष
मुंबई:


Chhaava Movie: छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित असलेला छावा चित्रपट सध्या तुफान गाजतोय. या चित्रपटाच्या निमित्तानं संभाजी महाराजांच्या आयुष्यावर, त्यांनी केलेल्या बलिदानावर चर्चा सुरु झाली आहे. त्याचवेळी या चित्रपटावर आक्षेपही नोंदवण्यात आलाय. या चित्रपटातील प्रसंगावर शिर्के कुटुंबीयांनी आक्षेप घेतला आहे. 

पुण्यात शुक्रवारी (21 फेब्रुवारी) शिर्के कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेत  चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि छावा कादंबरीच्या प्रकाशकांना पुरावे दाखवण्याची नोटीस बजावली होती. दिग्दर्शक उतेकर यांनी उत्तर द्यावं अन्यथा महाराष्ट्रात त्यांना फिरु देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला होता.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

शिर्के कुटुंबीयांच्या आक्षेपांना दिग्दर्शक उतेकर यांनी उत्तर दिलं आहे. उतेकर यांनी दिलेल्या उत्तराची ऑडिओ क्लिप NDTV मराठीकडं आहे. त्यामध्ये त्यांनी हा चित्रपट संपूर्णपणे छावा या शिवाजी सावंत यांनी लिहिलेल्या कादंबरीवर आधारित आहे. त्यामध्ये गणोजी शिर्के, कानोजी शिर्के, शिरकाण गावचे त्यांचं कुलदैवत कुठलं या सर्व गोष्टींचा उल्लेख आहे. त्याचबरोबर मी चुकीचा नसेन तर महाराजांवर जी टीव्ही मालिका आली होती त्यामध्येही अगदी तसंच नावासकट, गावासकट दाखवलं आहे, असं सांगितलं.

या चित्रपटामध्ये मी त्यांचं नावही घेतलेलं नाही. गावही दाखवलेलं नाही. गणोजी आणि काणोजी या एकेरी नावानं त्यांचा चित्रपटात उल्लेख केला आहे. त्यांचं आडनाव अजिबात दाखवलेलं नाही.  त्यांचं गाव कोणतं हे अजिबात दाखवलेलं नाही, या महत्त्वाच्या मुद्याकडं लक्ष वेधलं आहे.

हा विषय पैसे कमावण्यासाठी नव्हताच. पैसे कमावण्यासाठी मी इतका मोठा धोका का घेईल? इतका वादग्रस्त विषय मी का घेईल? हा राजे काय होते हे जगाला कळावे यासाठी प्रामाणिक प्रयत्न होता, असा खुलासा उतेकर यांनी केला आहे. 

( नक्की वाचा : Chhaava : छावा चित्रपटावर शिर्के कुटुंबीय आक्रमक, दिग्दर्शकाला राज्यात फिरु न देण्याचा इशारा )
 

लक्ष्मण उतेकर यांनी शिर्के कुटुंबीयांना दिलेलं संपूर्ण उत्तर 

आदरणीय भूषणजी,

सुरुवातीला सॉरी, कारण मी तुमचा काल फोन उचलला नाही. कारण मी वाईट नेटवर्क एरियामध्ये आहे. मी तुमची पत्रकार परिषद पाहिली आणि हा मेसेज वाचला. तुमच्या नकळत भावना दुखावल्या असतील तर मी तुमची सर्वप्रथम माफी मागतो.

सर, सिनेमाच्या सुरुवातीला एक डिस्क्लेमर येतो आणि त्यामध्ये लिहिलं आहे की हा चित्रपट पूर्णत: छावा या कादंबरीवर आधारित आहे. ती कादंबरी शिवाजी सावंत यांनी लिहिली होती. या चित्रपटाची कथा, पटकथा, हे सर्व आम्ही छावामध्ये जसं लिहिलं आहे तसंच रंगवण्याचा प्रयत्न केला आहे. कादंबरी शब्दांनी रंगवली जाते आणि चित्रपट लोकांना दाखवला जातो. पम, माहिती तीच असते. मी त्यामध्ये लेखक आणि दिग्दर्शक म्हणून काहीही ट्विटस्ट केलं नाही.

छावामध्ये गणोजी शिर्के, कानोजी शिर्के, शिरकाण गावचे त्यांचं कुलदैवत कुठलं या सर्व गोष्टींचा उल्लेख आहे. ते पुस्तक अजूनही बाजारात उपलब्ध आहे. त्याचबरोबर मी चुकीचा नसेन तर महाराजांवर जी टीव्ही मालिका आली होती त्यामध्येही अगदी तसंच नावासकट, गावासकट दाखवलं आहे.

( नक्की वाचा : Devendra Fadnavis '... तर माझं फडणवीस नाव बदला', शिवजयंतीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्याचं चॅलेंज )
 

मला तुम्हाला कळकळीची विनंती आहे की, या चित्रपटामध्ये मी त्यांचं नावही घेतलेलं नाही. गावही दाखवलेलं नाही. गणोजी आणि काणोजी या एकेरी नावानं त्यांचा चित्रपटात उल्लेख केला आहे. त्यांचं आडनाव अजिबात दाखवलेलं नाही.  त्यांचं गाव कोणतं हे अजिबात दाखवलेलं नाही. मला कुणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या. त्यामुळे मी ती खबरदारी नक्की घेतली आहे.

तुमचे बंधू डॉ. राजेशिर्के हे तर माझे मित्र आहेत. या चित्रपटाचा उद्देश कुणाच्या भावना दुखवण्याच्या नव्हत्या. पैसे कमावण्यासाठी मला हा चित्रपट बनवण्याची गरजच नव्हती. माझ्याकडे पैसे कमावण्यासाठी इतर भरपूर विषय होते. छत्रपती संभाजी महाराज काय होते हे जगाला कळावं म्हणून आमच्या टीमनं चार वर्ष मेहनत करुन हा चित्रपट बनवला आहे.

छत्रपती संभाजी महाराजांवर किती गढूळ लिखाण आहे हे तुम्हाला माहिती आहे. ते पुसण्याचा हा प्रयत्न होता. आपले राजे काय होते हे बच्चा-बच्चाला कळावं हा एक प्रयत्न होता. हा विषय पैसे कमावण्यासाठी नव्हताच. पैसे कमावण्यासाठी मी इतका मोठा धोका का घेईल? इतका वादग्रस्त विषय मी का घेईल? हा राजे काय होते हे जगाला कळावे यासाठी प्रामाणिक प्रयत्न होता. त्यामुळे पुन्हा एकदा तुमचं मन नकळत दुखावलं असेल तर माफी मागतो. पण, चित्रपटात कुठेही शिर्के या आडनावाचा उल्लेख झालेला नाही. त्यांच्या गावाचा उल्लेख नाही.

छावा कादंबरीत, अन्य मराठी मालिका, चित्रपटात तो उल्लेख केलेला आहे. आजही ते इंटरनेटवर उपलब्ध आहेत. छावा कुटुंबात कुठेही शिर्के आडनावाचा उल्लेख नाही. तुम्ही माझ्या भावना समजून घ्याल, असं आवाहन उतेकर यांनी केलं आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: