Coldplay Concert Mumbai : तिकीटं मिळाली नाहीत? चिंता नको, 'इथे' मिळण्याची अजूनही संधी 

Music Of The Spheres : विशेष म्हणजे या तिकिटांची किंमत दोन हजारांपासून सुरू होते.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

ब्रिटीश रॉक बँड कोल्डप्ले (Coldplay Concert Mumbai) 'म्युझिक ऑफ द स्फीयर्स' वर्ल्ड टूरसाठी जानेवारी 2025 मध्ये भारतात येत आहेत. रविवारी २२ सप्टेंबर रोजी बुकिंग विंडो सुरू झाली. मात्र भारतातील कोल्डप्लेची क्रेझ आणि तिकीट बुकिंगच्या चढाओढीमुळे बुक माय शो अॅप क्रॅश झालं. अनेक वापरकर्त्यांनी तिकीट बुकिंगदरम्यान आलेल्या अडचणी सोशल मीडियावर शेअर केल्या. भारतातील कॉन्सर्टची क्रेझ पाहता आता कोल्डप्ले बँड दोन दिवसांऐवजी तीन दिवस भारतात सादरीकरणाची घोषणा करण्यात आली आहे. 

कोल्डप्ले बँडचं सादरीकरण 19-20 जानेवारी 2025 रोजी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये होणार आहे. बुक माय शो अॅपवर शोची बुकिंग रविवारी दुपारी 12 वाजता सुरू झाली होती. तिकीट बुक करण्यासाठी इतकी चढाओढ झाली की, बुक माय शोचं संकेतस्थळ क्रॅश झालं. काही वेळानंतर संकेतस्थळ पुन्हा सुरू झालं. त्यावेळी वापरकर्त्यांचं ट्रॅफिक दहा लाखांच्या घरात होते. त्यामुळे युजर्स लाइन सिस्टमच्या माध्यमातून तिकीट बुक करू शकतील अशी घोषणा करण्यात आली. आधी एक वापरकर्ता आठ तिकीट खरेदी करू शकत होता, मात्र यात बदल करून हा आकडा चारवर करण्यात आला. 

नक्की वाचा - पुण्यातील 'त्या' महिला कर्मचाऱ्याच्या मृ्त्यूमुळे व्यवस्थेत मोठा बदल होणार? राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दखल

कोल्डप्लेचं तिसऱ्या दिवशीही सादरीकरण...
भारतात कोल्डप्लेचं सादरीकरण दोन दिवसांऐवजी तीन दिवस होणार आहे. त्यामुळे 19-20 आणि 21 जानेवारी 2025 हे तीन दिवस कोल्डप्लेचं सादरीकरण होईल. 

नऊ वर्षांनंतर भारतात सादरीकरण...
कोल्डप्ले बँड नऊ वर्षांनंतर भारतात सादरीकरण करणार आहे. 2016 मध्ये मुंबईत कोल्डप्लेचं मुंबईतील गोल्डन सिटिझन फेस्टिवलमध्ये आयोजन केलं होतं. यावेळी 18 हजार चाहते सहभागी झाले होते. ज्यात अनेक बॉलिवूड कलाकारांचाही सहभाग होता. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

तिकिटांच्या किमती 25 ते 35 हजार..
यावेळी तिकिटांच्या किमती 24 हजार ते 35 हजारांपर्यंत आहेत. याशिवाय काही तिकीटं अडीच हजारांपासून मिळत होते. 

निराश होऊ नका, संधी आहे...
ज्या चाहत्यांना कोल्डप्लेची तिकीटं मिळू शकलेली नाहीत, त्यांनी निराश होण्याचं कारण नाही. कोल्डप्ले मर्यादित स्वरुपातील Infinity Tickets लॉन्च करणार आहेत. ही तिकीटं शोच्या दिवशी लॉन्च करण्यात येईल. कोल्डप्लेच्या शोच्या दिवशी Infinity Tickets जाहीर केली जातील. या तिकिटांची किंमत साधारण दोन हजारांच्या घरात असते. यावेळी प्रत्येक व्यक्तीने किमान दोन तिकीट खरेदी करणं अनिवार्य असेल. लवकरच याबाबतची अधिक माहिती प्रसिद्ध केली जाईल.