जाहिरात

Video : कॉमेडियन पुन्हा आला चर्चेत! RJ महावशसोबत समय रैनाने धनश्री वर्माला डिवचलं, चहलनेही दिला भन्नाट रिप्लाय

Samay Raina With RJ Mahvash Viral Video : कॉमेडियन समय रैना मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रकाशझोतात आला होता.समय रैनाची आता पुन्हा एकदा चर्चा रंगलीय.

Video : कॉमेडियन पुन्हा आला चर्चेत! RJ महावशसोबत समय रैनाने धनश्री वर्माला डिवचलं, चहलनेही दिला भन्नाट रिप्लाय
Samay Raina On Dhanashree Verma Video

Samay Raina With RJ Mahvash Viral Video : कॉमेडियन समय रैना मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रकाशझोतात आला होता.समय रैनाची आता पुन्हा एकदा चर्चा रंगलीय. यूजवेंद्र चहलची रुमर्ड गर्लफ्रेंड आरजे महावशसोबत रैनाने एक कॉस्मेटिक ब्रॅण्ड सुरु केला आहे. या सीरिजमध्ये त्यांनी धनश्री वर्माचं थेट नाव घेतलं नाहीय. पण चाहत्यांचं म्हणणं आहे की, या सीरिजमध्ये त्यांनी चहल आणि धनश्रीच्या नात्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. समय रैनाने या शो मध्ये त्याच्या दोन महिन्यांच्या संघर्षाबाबत माहिती दिली. याचदरम्यान त्याने धनश्रीच्या त्या दाव्याबाबतही चर्चा केली. ज्यामध्ये तिने म्हटलं होतं की, युजवेंद्र चहलने लग्नाच्या दोन महिन्यानंतरच तिला धोका दिला होता. जे त्याने रिअॅलिटी शो राइज एंड फॉलमध्ये केलं होतं.

याचसोबत समयने धनश्रीच्या पॉडकास्टवरही निशाणा साधला. विशेष म्हणजे त्याने 'बी यूअर ओन शुगर डॅडी' असा मेसेज लिहिलेली टी-शर्टही घातली होती.यूजवेंद्र चहलने समय आणि महावश यांच्या चर्चेवर रिअॅक्शन दिली. आणखी एका केससाठी तयार राहा,असा इशाराच चहलने त्यांना दिला होता. हा व्हिडीओ समय रैनाने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात आरजे महावश म्हणते की, तिचा फेव्हरेट अक्षर एम आहे. यावर समय रैना म्हणतो, माझं फेव्हरेट आहे यू,जी..जे युजवेंद्र चहलकडे इशारा देतं. महावश जेव्हा तिच्या जीवनाबाबत विचारते, तेव्हा समय म्हणतो, माझ्याबाबतीत मध्यंतरी राईज अँड फॉल झालं होतं. पण आता सर्वकाही ठीक आहे. पहिल्या दोन महिन्यांमध्ये हा इश्यू होता. 

नक्की वाचा >> रोहित पर्व संपलं? टीम इंडियाला मिळाला नवा कॅप्टन, BCCI ने केली घोषणा, खेळाडूंची लिस्ट वाचा एका क्लिकवर

इथे पाहा व्हायरल व्हिडीओ


त्यानंतर समय महावशला विचारतो, 8 कोटींचं अर्ध किती असतं? यावर महावश म्हणते 4 कोटी. नंतर ती म्हणते, समयवर कोणताही फिल्टर नाहीय. व्हिडीओ शेअर करत समय रैनानं म्हटलंय, पॉडकास्टमध्ये आरजे महावश घाबरली होती.यावर यूजवेंद्र चहलनेही खिल्ली उडवली आहे. यूजवेंद्र सोबत चर्चा केल्याचा एक स्क्रिनशॉटच समयने शेअर केला. या यूजवेंद्र हसत असल्याचं पाहायला मिळतंय. समय रैनाने फोटो शेअर करत म्हटलं, लव्ह यू मेरे शुगर डॅडी आणि खूप साऱ्या स्माईली इमोजी शेअर केल्या. तर चहलने कमेंट करत पोस्टवर म्हटलं, आणखी एका केससाठी तयार राहा..समय रैना#4 कोटी.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com