Zaira Wasim Married : वयाच्या 24 व्या वर्षी जायरा अडकली लग्नबंधनात, निकाहाचे फोटो केले शेअर

पहिल्या फोटोत जायरा आपल्या निकाहनाम्यावर स्वाक्षरी करताना दिसत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
जायराच्या लग्नाचे फोटो व्हायरल
नवी दिल्ली:

Zaira Wasim Married : आमिर खान (24 वर्षे) यांच्या दंगल चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणारी अभिनेत्री जायरा वसीन हिने 2019 मध्ये अभिनय क्षेत्राला अलविला म्हटलंय. आता तिने फोटो शेअर करीत चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर लग्नाचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये वर-वधुचे चेहरे दिसत नसले तरीही त्यांच्या लग्नाची झलक पाहायला मिळते. चाहत्यांकडून जायरावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. 

पहिल्या फोटोत जायरा आपल्या निकाहनाम्यावर स्वाक्षरी करताना दिसत आहे. तिने हातावर मेंदी लावली असून हातात अंगठी घातली आहे. दुसऱ्या फोटोत जायरा पतीसह कॅमेऱ्यासमोर पाठ करून उभी आहे. 


2016 मध्ये आलेल्या दबंग चित्रपटात वयाच्या 16 व्या वर्षी जायराने कुस्तीपट्टू गीता फोगाटची भूमिका साकारली होती. यासाठी तिने सर्वोत्कृष्ट सहकलाकाराचं नॅशनल अवॉर्ड मिळालं होतं. यानंतर 2017 मध्ये आलेल्या सिक्रेट सुपरस्टारमधून तिने बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी जागा निर्माण केली होती. मात्र 2019 मध्ये जायराने चित्रपटक्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतला. आता जायराने वयाच्या 24 व्या वर्षी लग्नाची गुड न्यूज दिली आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Shivali Parab Video : शिवाली परबचा तो व्हिडीओ पाहून रितेश देशमुखला लागलं वेड, म्हणाला...

2016 मध्ये आलेल्या दबंग चित्रपटात वयाच्या १६ व्या वर्षी जायराने कुस्तीपट्टू गीता फोगाटची भूमिका साकारली होती. यासाठी तिने सर्वोत्कृष्ट सहकलाकाराचं नॅशनल अवॉर्ड मिळालं होतं. यानंतर २०१७ मध्ये आलेल्या सिक्रेट सुपरस्टारमधून तिने बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी जागा निर्माण केली होती. मात्र २०१९ मध्ये जायराने चित्रपटक्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतला. यावेळी तिने एक नोट शेअर केली होती. ज्यामध्ये तीन लिहिलं होतं की, ती आपल्या कामामुळे खूश नाही. धर्माचा हवाला देत ती ग्लॅमरच्या जगापासून दूर गेली. पाच वर्षांपूर्वी मी एक असा निर्णय घेतला, ज्यामुळे माझं आयुष्य कायमचं बदललं. बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवताच माझ्यासाठी प्रसिद्धीची अनेक द्वारं खुली झाली. अनेकदा मला तरुणांचा रोल मॉडेलही मानलं गेलं. मात्र हे मला अपेक्षित नव्हतं.