Bollywood News :'इश्क'मधील ती चिमुरडी आज देतेय काजोल-जुहीला टक्कर; 28 वर्षांनीही कायम आहे जलवा

Bollywood News :तुम्हाला आमिर खान, अजय देवगण, जुही चावला आणि काजोल यांची *1997* साली रिलीज झालेली 'इश्क' (Ishq) हा सुपरहिट चित्रपट आठवतोय का?

जाहिरात
Read Time: 2 mins
Bollywood News : गुलाबी फ्रॉकमध्ये असलेली ती गोंडस चिमुरडी एका सीनमध्ये काजोलच्या कडेवर असते.
मुंबई:

Bollywood News : तुम्हाला आमिर खान, अजय देवगण, जुही चावला आणि काजोल यांची *1997* साली रिलीज झालेली 'इश्क' (Ishq) हा सुपरहिट चित्रपट आठवतोय का? त्या वर्षीच्या सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी ही एक फिल्म होती. पण या फिल्ममध्ये काजोलसोबत दिसलेली एक लहान मुलगी तुम्हाला आठवते का? गुलाबी फ्रॉकमध्ये असलेली ती गोंडस चिमुरडी एका सीनमध्ये काजोलच्या कडेवर असते आणि काजोल तिला प्रेमाने उचलून घेते.

बालकलाकार ते 'दंगल' गर्ल

आज तीच चिमुकली मुलगी बॉलीवूडची एक  आघाडीची अभिनेत्री म्हणून समोर आली आहे. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने ती चाहत्यांना वेड लावतेय. अरे, ती दुसरी कोणी नसून दंगल (Dangal) फिल्ममध्ये  गीता फोगाटची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री फातिमा सना शेख आहे. नुकताच तिचा झालेला कायापालट पाहून चाहते तिच्या सौंदर्यावर फिदा झाले आहेत आणि तिला पाहून जुन्या हिरोईन्सनाही ती टक्कर देतेय असं चाहते म्हणत आहेत.

फातिमाची नुकतीच 'गुस्ताख इश्क' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या स्क्रीनिंगदरम्यान फातिमा सना शेख पांढऱ्या रंगाच्या साडीत एखाद्या अप्सरेसारखी सुंदर दिसत होती. याच कार्यक्रमाला अभिनेत्री काजोलनेही हजेरी लावली होती. यावेळी फातिमा आणि काजोलने एकत्र फोटोसाठी पोज दिले आणि त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडीओ पाहताच लोकांना लगेच 'इश्क' फिल्ममधील तो सीन आठवला, ज्यात काजोलने फातिमाला कडेवर घेतलं होतं.

( नक्की वाचा : Palash Muchhal : 'स्मृतीपेक्षाही दोघांची जास्त जवळीक', पलाश ढसढसा रडला, आईनं सांगितलं 'त्या' दिवशी काय घडलं? )

फातिमा सना शेखने 'दंगल'मध्ये शानदार काम करून लोकप्रियता मिळवली. पण तुला माहीत आहे का, की 'दंगल'पूर्वीही तिने आमिर खानसोबत स्क्रीन शेअर केली होती! नुकत्याच एका मुलाखतीत फातिमा स्वतः याबद्दल बोलली. ती म्हणाली, 'खूप वर्षांपूर्वी 'इश्क' नावाची ती फिल्म होती. त्यात एक सीन आहे, जिथे आमिर ‘मरा, मरा, मरा' करत जातो आणि समोर काजोलच्या हातात एक लहान मुलगी असते, ती मुलगी मीच आहे. हो, ती मीच होते.'

Advertisement

फातिमाचे फिल्मी करीअर

फातिमा सना शेखने बालकलाकार म्हणून चाची 420, वन 2 का 4 आणि बडे दिनवाले यांसारख्या फिल्म्समध्ये काम केले आहे. सध्या ती 'गुस्ताख इश्क' या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. यापूर्वी ती 'दंगल' (Dangal) आणि 'मेट्रो इन दिनो' (Metro In Dino) यांसारख्या चित्रपटात दमदार काम करताना दिसली आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Wedding Night: लग्नाच्या पहिल्या रात्री नवरदेव पळाला आणि 5 दिवसांनी हरिद्वारमध्ये सापडला, कारणही सांगितलं... )

Topics mentioned in this article