जाहिरात

एड्समुळे झाला 35 वर्षांच्या अभिनेत्रीचा मृत्यू, 10 वर्ष होती गायब आणि बेघर, कुटुंबीयांपासून तोडलं होतं नातं

Hollywood star: हॉलीवूडच्या चंदेरी दुनियेत अतिशय कमी वयात अफाट लोकप्रियता मिळवलेली एक प्रसिद्ध अभिनेत्री गेल्या 10 वर्षांपासून ग्लॅमरच्या जगातून अचानक गायब झाली होती.

एड्समुळे झाला 35 वर्षांच्या अभिनेत्रीचा मृत्यू, 10 वर्ष होती गायब आणि बेघर, कुटुंबीयांपासून तोडलं होतं नातं
Hollywood star: हॉलिवूडच्या अभिनेत्रीचा एड्समुळे मृत्यू झाला.
मुंबई:

Hollywood star: हॉलीवूडच्या चंदेरी दुनियेत अतिशय कमी वयात अफाट लोकप्रियता मिळवलेली एक प्रसिद्ध अभिनेत्री गेल्या 10 वर्षांपासून ग्लॅमरच्या जगातून अचानक गायब झाली होती. घरदाराचा त्याग करून रस्त्यावर भटकण्याची वेळ आलेल्या या 35 वर्षीय अभिनेत्रीचा अखेर अत्यंत वेदनादायी अंत झाला आहे. काही दिवसांपूर्वीच तिचे निधन झाले असून, आता समोर आलेल्या तिच्या मृत्यूच्या मुख्य कारणाने संपूर्ण सिनेसृष्टीसह तिच्या चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. पडद्यावर जगभरातील करोडो प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी ही अभिनेत्री आयुष्याच्या शेवटच्या क्षणी अत्यंत एकटी आणि आजारी होती.

 एड्समुळे दुर्दैवी अंत

'द रिंग' आणि 'लिलो अँड स्टिच' सारख्या जगप्रसिद्ध चित्रपटांमधून बालकलाकार म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणारी अभिनेत्री डेवे चेस हिचे 16 जून 2026 रोजी निधन झाले. तिच्या मृत्यूच्या वेळी नेमके कारण समोर आले नव्हते, मात्र आता लॉस एंजिल्स कोरोनर ऑफिसने तिच्या मृत्यूची अधिकृत कारणे जाहीर केली आहेत. डेवे चेस हिचा मृत्यू एड्स (AIDS) मुळे झाल्याची धक्कादायक पुष्टी तपास अहवालात करण्यात आली आहे. याशिवाय ती बॅक्टेरियल मेनिन्जाइटिस, सेप्टिक शॉक आणि शरीरातील गंभीर संसर्गाशी झुंजत होती.

( नक्की वाचा : Aishwarya Rai: सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर कशी होती ऐश्वर्याची अवस्था? इतक्या वर्षांनी उघड झालं 'ते' भयानक सत्य )

वैभवाच्या शिखरावरून थेट रस्त्यावर

डेवे चेस हिने अतिशय लहान वयात अभिनयाच्या जोरावर मोठे यश संपादन केले होते. 'द रिंग' चित्रपटातील 'समारा मॉर्गन' हे तिचे डरावने पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. मात्र, वर्ष 2016 नंतर ती अचानक मनोरंजन विश्वातून गायब झाली. तिच्या पूर्व मॅनेजरने दिलेल्या माहितीनुसार, एका मोठ्या चित्रपटाच्या मिटिंगला ती आलीच नाही आणि त्यानंतर तिने कुटुंब व मॅनेजर या सर्वांशी असलेले संबंध कायमचे तोडून टाकले. पुढील काळात ती अंमली पदार्थांच्या आहारी गेली, तिचे नाव चोरीचे वाहनं बाळगल्याप्रकरणी आणि ड्रग्ज प्रकरणात पोलिसांत आले. ती दीर्घकाळ बेघर म्हणून रस्त्यावर जीवन जगत होती.

Latest and Breaking News on NDTV

प्रियकराचा भावनिक संदेश आणि अपूर्ण राहिलेली स्वप्ने

डेवे हिच्या निधनापूर्वी तिचा बॉयफ्रेंड रॉय हर्नांडेज याने तिच्या उपचाराच्या खर्चासाठी लोकवर्गणी (Crowdfunding) गोळा करण्यास सुरुवात केली होती. डेवेचे बालपण अत्यंत संघर्षाचे होते आणि कुटुंबापासून दूर गेल्यानंतर ती नेहमीच सुरक्षित आयुष्याच्या शोधात होती, असे रॉयने सांगितले. त्याने डेवेला एक चांगले आयुष्य देण्याचे वचन दिले होते, मात्र ते अपूर्णच राहिले. रुपेरी पडद्यावर यशाची शिखरे सर करणारी एक गुणी अभिनेत्री शेवटी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत, आजारपण आणि असीम एकटेपणाशी लढता लढता हे जग सोडून गेली.

( नक्की वाचा : अभिनेता आर. माधवनने 21 दिवसांत कसं कमी केलं वजन? फॅन्ससाठी सांगितले Weight Loss करण्याचे 11 फॉर्म्युले )

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com