जाहिरात

Deepika Padukone: दीपिका पादुकोणने लेकीचा बर्थडे खास पद्धतीने केला साजरा, Dua's Birthday Photo

Deepika Padukone Dua's Birthday Photo: दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहने लाडक्या लेकीचा पहिला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. पाहिला का फोटो?

Deepika Padukone: दीपिका पादुकोणने लेकीचा बर्थडे खास पद्धतीने केला साजरा, Dua's Birthday Photo
"Deepika Padukone Dua's Birthday Photo: दीपिका पादुकोणने लेकीच्या वाढदिवसाचा फोटो शेअर केला"

Deepika Padukone Dua's Birthday Photo: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह यांची लाडकी लेक दुआचा सोमवारी (8 सप्टेंबर) पहिला वाढदिवस होता. दीपिका-रणवीरने दुआचा पहिला वाढदिवस खास पद्धतीने साजरा केला. दीपिकाने सोशल मीडियावर बर्थडे सेलिब्रेशनचा फोटोही चाहत्यांसोबत शेअर केलाय. 

दीपिका पादुकोणची लेकीसाठी खास पोस्ट | Deepika Padukone Special Post For Daughter Dua 

दीपिका पादुकोणने लेकीसाठी स्वतः केक तयार केला| Deepika Bakes Cake For Daughter 

अभिनेत्री दीपिका पादुकोणने लाडक्या लेकीच्या पहिल्या वाढदिवशी स्वतः केक तयार केला होता. होममेड चॉकलेट केकचा फोटो दीपिकाने सोशल मीडियावर शेअरही केलाय. "माझी प्रेमाची भाषा? माझ्या लेकीच्या पहिल्या वाढदिवसासाठी केक तयार करतेय", असे कॅप्शनही तिने फोटो दिलाय. दीपिका पादुकोणने शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांसह सेलिब्रिटींनीही शुभेच्छांचा वर्षाव केलाय. 

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Deepika Padukone Instagram

दुआचा व्हिडीओ झाला होता व्हायरल | Deepika Daughter Video Viral  

दुआचा जन्म झाल्यापासून दीपिका संपूर्ण वेळ लेकीसोबत राहणं पसंत करतेय. लेकीचे योग्य पद्धतीने संगोपन व्हावं, यासाठी दीपिकाने आगामी सिनेमांचे शुटिंगही सुरू केलेले नाही. 8 सप्टेंबर 2024 रोजी दीपिकाच्या मुलीचा जन्म झाला. काही दिवसांनंतर दीपिकाने लेकीचे नाव देखील जाहीर केले होते. दीपिकाच्या लेकीची झलक पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. पण हे जोडपे मुलीला प्रसिद्धी माध्यमांपासून पूर्णपणे दूर ठेवत आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी दुआचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही झाला होता. मुलीचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने जोडप्याने नाराजी व्यक्त केली होती. 

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Deepika Padukone Instagram

Listen to the latest songs, only on JioSaavn.com