Deepika Padukone | SRK King Movie: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित सिनेमा 'किंग'च्या चित्रिकरणास सुरुवात झालीय. शाहरुख खानच्या सिनेमामध्ये कोणकोण झळकणार याबाबत प्रेक्षकांना उत्सुकता होती. तर मंडळींनो तुमच्या प्रश्नाचे उत्तर स्वतः अभिनेत्रीनंच दिलंय. 'किंग' सिनेमामध्ये शाहरुखसोबत झळकणार असल्याचे सांगत अभिनेत्रीने खास पोस्टही शेअर केलीय. ही अभिनेत्री दुसरीतिसरी कोणी नसून बॉलिवूडची 'शांती' म्हणजेच दीपिका पादुकोण आहे.
मोठ्या सिनेमातून दीपिका पादुकोणची एक्झिट
दीपिका पादुकोण प्रभासच्या 'कल्कि 2898एडी' सिनेमाच्या सीक्वेलमधून बाहेर पडलीय. निर्मात्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे याबाबतची माहिती प्रेक्षकांना 18 सप्टेंबर रोजी दिली. पोस्टमध्ये लिहिलं होतं की, दीपिका पादुकोण 'कल्कि 2898 एडी' सिनेमाच्या आगामी सीक्वेलचा भाग नसणारेय, अशी अधिकृत घोषणा करण्यात येतेय. विचारविनिमय केल्यानंतर आता आम्ही एकत्र काम करणार नाही, असा निर्णय घेण्यात आलाय. पहिल्या सिनेमाच्या प्रवासानंतरही आमच्यात कायमस्वरुपी भागीदारी होऊ शकली नाही. 'कल्कि 2898एडी' यासारख्या सिनेमांसाठी पूर्ण समर्पण आणि त्याहूनही अधिक वचनबद्धतेची आवश्यकता असते. दीपिकाला तिच्या भविष्यातील प्रोजेक्टसाठी शुभेच्छा."
निर्मात्यांच्या या पोस्टनंतर दीपिका पादुकोणच्या वचनबद्धतेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले. पण दीपिकाने शांत राहणं पसंत केले. नुकतेच तिने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट व्हायरल होतेय आणि सर्वसामान्यांसह सेलिब्रिटीही तिला शुभेच्छा देत आहेत.
(नक्की वाचा: Deepika Padukone Dropped: दीपिकाला बड्या चित्रपटातून नारळ, कोण करणार रिप्लेस?)