- एक्ट्रेस दीपिका पादुकोण ने आबू धाबी के लिए एक टूरिज्म ऐड शूट किया है, जिसमें वह हिजाब पहने दिख रही हैं.
- टूरिज्म ऐड में दीपिका के सिर पर हिजाब पहनने को लेकर उन्हें सोशल मीडिया पर जमकर ट्रोल किया जा रहा है.
- कुछ लोग दीपिका के जेएनयू में दिए गए बयान और उनके “My Choice My Freedom” कैंपेन को लेकर भी पोस्ट कर रहे हैं.
Deepika Padukone Hijab Row: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या नव्या जाहिरातीवरुन वाद सुरू झालाय. हिजाब घातल्याने तिला सोशल मीडियावर अभिनेत्रीला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जातंय. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहने नुकतेच अबुधाबासाठी जाहिरातीचे चित्रिकरण केले. जाहिराताचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. जाहिरातीमध्ये हिजाब घालून दीपिका पादुकोण शेख झायेद ग्रँड मशिदीप्रति आदर व्यक्त करताना दिसतेय. जाहिरातीमध्ये दीपिका आणि रणवीर अबुधाबीची संस्कृती, इतिहास आणि वारसा दाखवत आहेत.
या जाहिरातीवरुन सोशल मीडियावर वाद सुरू आहे. दीपिकाने परिधान केलेल्या पोशाखावरुन नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. काही लोक जेएनयूमधील दीपिका पादुकोणचे विधान आणि तिच्या "My Choice, My Freedom" कॅम्पेनसंदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X'वर पोस्ट करत आहेत. काहीजण दीपिकाच्या समर्थनार्थही बोलत आहेत.
(नक्की वाचा: Deepika Padukone: दीपिका पादुकोणने लेकीचा बर्थडे खास पद्धतीने केला साजरा, Dua's Birthday Photo)
जाहिरातीमध्ये दीपिका पादुकोण पती रणवीरसोबत एका मशिदीमध्ये दिसत आहेत, तिने मरुन रंगाचा हिजाब घातलाय. तर रणवीरने काळ्या रंगाचं ब्लेझर घातलंय. तू संग्रहालयात जागा मिळण्यास पात्र आहेस, असे दीपिका रणवीरला जाहिरातीमध्ये सांगताना दिसतेय.
काही युजर्स दीपिकाच्या हिजाब लुकचं कौतुक करत आहेत तर काहींनी तिला ट्रोल केलंय. "दीपिका आणि रणवीरने परदेशी संस्कृतीचा प्रचार करण्यामध्ये जितका उत्साह दाखवत आहेत, तितकाच आनंद भारतीय संस्कृतीचा प्रचार करण्यात दाखवला असता तर ते अधिक चांगले झाले असते", असे म्हणत काहींनी नाराजी व्यक्त केलीय.