
Dhanashree Verma On Yuzvendra Chahal Video : भारताचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माचा घटस्फोट होऊन खूप दिवस झाले आहेत. पण या क्यूट कपलच्या घटस्फोटामागच्या कारणांबाबत अजूनही सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगल्या आहेत.हे दोघेही वैवाहिक जीवनातून वेगळे का झाले? याबाबत जाणून घेण्याची लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच खुद्द धनश्री वर्मानेच याविषयी मोठा खुलासा केला आहे.सध्याच्या घडीला धनश्री राईज अँड फॉल शो चा महत्त्वपूर्ण भाग आहे. या शो मध्ये धनश्रीने एक्स हस्बंड युजवेंद्र चहलबाबत मोठं विधान केलं आहे. धनश्रीचा हा व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला आहे.
धनश्री वर्माने चहलसोबतच्या घटस्फोटाबाबत केला मोठा खुलासा
या व्हिडीओत पाहू शकता की, अर्जुन बिजलानी धनश्रीला प्रश्न विचारतो की, तिंच आणि चहलचं लव्ह मॅरेज झालं होतं का? यावर भावनिक होत धनश्री म्हणते, आमचं अरेंज मॅरेज झालं होतं. सुरुवात अरेंज मॅरेजनं झाली होती.लग्न करण्याचा माझा कोणताच प्लॅन नव्हता. पण चहलला डेटिंगशिवाय लग्न करायचं होतं.त्यानंतर अर्जुन धनश्रीला विचारतो की, लग्न करायचं प्लॅन नव्हता मगं का केलं? यावर धनश्री उत्तर देत म्हणते, त्यावेळी तिने चहलला ज्याप्रकारे प्रेम केलं आणि त्याची काळजी घेतली, तेव्हा मला वाटलं की, लग्न करायला पाहिजे.
लग्नाआधी तुम्ही एकमेकांसोबत कितीवेळा डेट केलं होतं? असाही सवाल अर्जुनने उपस्थित केला. यावर धनश्री म्हणाली, ऑगस्टमध्ये आमचा साखरपूडा झाला होता.तर डिसेंबरमध्ये आम्ही लग्न केलं. याचदरम्यान ऑगस्टपासून डिसेंबरपर्यंत त्याच्यासोबतच फिरत राहिली. आम्ही नेहमी एकत्र राहायचो. यादरम्यान, मी त्याच्या वागणुकीत थोडा बदल झाल्याचं पाहिलं.
इथे पाहा धनश्री वर्माचा व्हिडीओ
Dhanashree Verma went on #RiseAndFall just to talk about Yuzi Chahal and gain sympathy.
— Mini (@perfectminz) October 4, 2025
pic.twitter.com/0ILSPofgSd
घटस्फोट घेण्याचा निर्णय कोणाचा होता? असा प्रश्न अर्जुनने विचारला. यावर धनश्रीने उत्तर दिलं की, त्याचा निर्णय होता. घटस्फोट घेण्याआधी त्याने याबाबत खूप विचार केला होता. ज्याचा त्याला कोणताच पश्चाताप झाला नाही. तुमच्या नात्यात कोणत्या तिसऱ्या व्यक्तीने एन्ट्री मारली होती का? असा प्रश्न विचारताच धनश्री भावनिक झाली. यावर आपण नंतर चर्चा करू, असं ती म्हणाली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world