Dharmendra News: बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे 24 नोव्हेंबर रोजी निधन झाले. धर्मेंद्र यांच्या निधनास महिना उलटून गेल्यानंतरही चाहत्यांच्या मनात त्यांच्या आठवणी आजही ताज्या आहेत. हीमॅनचं अंतिम दर्शन न मिळाल्याने चाहते निराश आहेत. यादरम्यान चाहते त्यांच्यासंदर्भातील वेगवेगळी माहिती इंटरनेटवर शोधण्याचा प्रयत्न करतायेत. धर्मेंद्र यांनी दोनदा लग्न केलं आणि या दोन लग्नापासून त्यांना एकूण सहा अपत्यं होती. धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांची चार मुलं आणि धर्मेंद्र-हेमा मालिनींच्या दोनी मुली अशी एकूण सहा मुलं त्यांना होती. धर्मेंद्र यांची सर्व मुलं विवाहित आहेत, त्यांनाही अपत्यं आहेत. धर्मेंद्र यांची सर्वांत लहान मुलगी अहाना देओलबाबत माहिती जाणून घेऊया...
(नक्की वाचा: Dharmendra: ईशा देओलने धर्मेंद्र यांचा खास व्हिडीओ केला शेअर; प्रकाश कौर, सनी-बॉबीसह 2 बहिणींचीही दिसली झलक)
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची छोटी मुलगी अहाना
वर्ष 1980मध्ये धर्मेंद्र यांनी हेमा मालिनींशी लग्न केलं. ईशा देओल आणि अहाना देओल या त्यांच्या मुली आहेत. ईशाचा जन्म वर्ष 1981 रोजी तर अहानाची जन्म तारीख 28 जुलै 1985 आहे. अहाना आज 40 वर्षांची आहे आणि तीन मुलांची आई आहे. अहानाचं लग्न 2 फेब्रुवारी 2014 रोजी दिल्लीतील उद्योगपती वैभव वोहराशी झालं. वैभव इंडो-फ्रेंच चेम्बर ऑफ कॉमर्समध्ये लॉजिस्टिक्स आणि मेरीटाइम कमेटीचा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. शिवाय एविएशन लॉजिस्टिक्स नेटवर्कचा दक्षिण एशिया विभागाचा रीजनल डायरेक्टर देखील आहे.
(नक्की वाचा: Ahana Deol Husband Photo: धर्मेंद्र आणि हेमा मालिनींचा छोटा जावई कोण आहे? पर्सनॅलिटी आहे एकदम हीरोसारखीच)
अहाना देओल तीन मुलांची आईची
अहाना देओलने वर्ष 2015मध्ये मुलगा डॅरियन वोहराला जन्म दिला,आता तो 10 वर्षांचा आहे. यानंतर पाच वर्षांनंतर म्हणजे 2020मध्ये अहानाने जुळ्या लेकींना जन्म दिला, या दोन्ही मुली पाच वर्षांच्या आहेत. हिंदुजा हॉस्पिटलमध्ये अहानाच्या जुळ्या लेकींचा जन्म झाला होता. धर्मेंद्र यांची छोटी लेक आपल्या संसारामध्ये व्यस्त आहे. अहानाने मोठी बहीण ईशा देओलच्या 'ना तुम जानो ना हम' सिनेमामध्येही काम केलं होतं. या सिनेमात हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका होत्या.