Ahana Deol Husband: बॉलिवूडचे ही-मॅन धर्मेंद्र यांचे 24 नोव्हेंबर रोजी राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या निधनाच्या दुःखातून देओल कुटुंबीयांसह त्यांचे चाहतेही अजून सावरलेले नाहीत. यादरम्यान धर्मेंद्र यांच्या खासगी आयुष्याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी लोक इंटरनेटवर वेगवेगळ्या गोष्टी सर्च करत आहेत. तुम्हाला धर्मेंद्र यांचा सर्वात छोटा जावई म्हणजे अहाना देओलचा पती कोण आहे हे माहितीये का? अहानाचा पती ग्लॅमरच्या दुनियेपासून दूर राहणं पसंत करतो. पण त्याचा लुक, त्याचे व्यक्तिमत्त्व एखाद्या हीरोसारखंच आहे.

(नक्की वाचा: Salman Khan News: मी चांगला अॅक्टर नाही, मला अॅक्टिंग येत नाही; भरकार्यक्रमात सलमान खानने केला खुलासा)
कोण आहे वैभव वोहरा?
धर्मेंद्र यांना चार मुली आहेत, ज्यामध्ये अहान देओल सर्वात लहान लेक. अहाना देओलने वर्ष 2014मध्ये बॉयफ्रेंड वैभव वोहराशी लग्न केले. वैभव हा मूळचा दिल्लीतील रहिवासी आहे आणि तो बिझनेसमन आहे. वैभव कॉन्टिनेंटल कॅरिअर्स प्रायवेट लिमिटेड कंपनीचा संचालक आहे. ही कंपनी सिंगापूर एअरलाइन्स, एअर फ्रान्स, लुफ्थांसा, एअर कनाडा यासारख्या प्रमुख आंतरराष्ट्रीय एअरलाइन्ससाठी फ्रेट फॉरवर्डिंग एजेंट म्हणून काम करते. वैभव लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन क्षेत्रामध्ये काम करतो.
(नक्की वाचा: Akshaye Khanna Video: तो सध्या काय करतोय! धुरंधरच्या प्रचंड यशानंतर अक्षय खन्ना कुठेय गायब? अलिबागचा Video समोर)
अहाना देओल आणि वैभव वोहराची ओळख कशी झाली?
अहाना आणि वैभवची पहिली भेट मोठी बहीण ईशा देओलच्या लग्नामध्ये झाली होती. बहिणीच्या लग्नात दोघं पहिल्यांदा भेटले आणि इथूनच त्यांच्या प्रेमकहाणीस सुरुवात झावी. काही वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अहाना-वैभवने 2 फेब्रुवारी 2014 रोजी मुंबईतील लग्न केले. दोघांनी तमिळ आणि पंजाबी परंपरेनुसार लग्न केलं होतं. वर्षभरानंतर अहानाने मुलाला जन्म दिला. यानंतर 2020मध्ये तिने जुळ्या मुलींना जन्म दिला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
